खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत
हजारो मुस्लिम कार्यकर्ते शिव सेनेत प्रवेश ,
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाने प्रेरणीत होऊन, तसेच शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष
श्री. असलम भाई कुरेशी , नेते श्री.प्रकाशजी पाटील ,उपनेते माजी आमदार श्री. रुपेशजी म्हात्रे , भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार श्री.शांतारामजी मोरे कल्याण मुरबाड
जिल्हा प्रमुख श्री.अरविंदजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी तालुकेतील कोनगाव परिसरातील माजी सरपंच स्वर्गीय : एकबाल खांडे यांचे पुतणे मा. ईबाद खांडे व अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी खासदार माननीय. डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या शुभ हसते शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी जिल्हा प्रमुख माननीय.गोपालजी लांडगे साहेब आमदार माननीय.राजेशजी मोरे साहेब कल्याण तालुका प्रमुख श्री.महेशजी पाटील अल्पसंख्याक विभागाचे कल्याण पश्चिम शहर अध्यक्ष श्री. फहीम शेख व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्यानी उपस्थित होते.

