डोंबिवलीच्या लाल मातीत रंगला कुस्तीचा जंगी सामना..
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
गावदेवी मातेच्या यात्रे निमित्त गावदेवी मंदिर संस्थान, मोठागांव देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ,आयोजित.
डोंबिवलीच्या लाल मातीत रंगला कुस्तीचा जंगी सामना..
कुस्ती ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे. कुस्तीची परंपरा ग्रामीण भागात कायमची रंगत आहे.ग्रामीण भागातून कुस्तीचा जंगी सामना आता शहरातील लोकांनाही पाहायला व अनुभवायला मिळत आहे.
डोंबिवली पश्चिम येथील लोकप्रिय जनसेवक दीपेश पुंडलीक म्हात्रे आणि त्यांचे बंधू जयेश पुंडलीक म्हात्रे यांच्या पुढाकाराने सालाबादप्रमाणे गावदेवी मातेच्या यात्रेनिमित्त गावदेवी मंदिर संस्थेच्या वतीने मोठा गाव देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ आयोजित जबरदस्त कुस्तीचा जंगी सामना भरविण्यात आला होता.
डोंबिवलीकरांना हा जंगी कुस्ती सामना प्रत्यक्षदर्शी पाहायला आणि अनुभवण्याचा आनंद मिळाला.मागील अनेक वर्ष आई गावदेवी मातेची(लोटू आई) यात्रा ग्रामस्थ मंडळ आयोजित करत आहेत. यात्रेत आदल्या दिवशी लोटू आईची पालखी निघते. तर दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचे सामने रंगतात. अनेक अनुभवी तसेच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून नवोदित खेळाडू तसेच कुस्ती उस्ताद या कुस्तीच्या आखाड्यात आपलं कौशल्य दाखवण्यासाठी इथे येत आहेत.कुणी पराजित होतात; तर कुणी विजयी..यंदाच्या कुस्ती सामन्यात विजयी होणाऱ्या कुस्ती उस्ताद यांना बजरंगी बली यांची गदा आणि रोख पारितोषिक देवून त्यांचा उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कुस्तीचा आखाड्यात विजयी झालेले हे कुस्ती उस्ताद पुढे राज्यस्तरावर त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर कुस्तीचा आराखड्यात भाग घेऊन, कुस्तीचा अनुभव मिळवीत आहेत.यंदाच्या कुस्ती आखाड्यात तरुण युवक सोबत तरुण मुलींनीही कुस्तीच्या आखाड्यात सहभाग घेवून,पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कुस्ती आराखड्यात कुस्ती खेळून,अनुभव मिळविल्याचे प्रत्यक्षदर्शी स्थानिक लोकांनी मुलींची कुस्ती पाहून त्यांची स्तुती केली,
स्थानिक नगर सेवक दीपेश पुंडलीक म्हात्रे ,जयेश पुंडलीक म्हात्रे यांच्या पुढाकारा ने ,व स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहयोगाने आईलोटू मातेची सुंदर हर्ष उल्लासने जत्रा संप्पन झाली,



