कल्याण पश्चिमेतील अनेक सुकलेल्या धोकादायक झाडाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
संभाव्य दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का
कल्याण : कल्याण पश्चिमेतील आग्रा रोड पेट्रोल पंपा समोर ज्ञानेश्वर मंदिराच्या बाजूला झाड पूर्णपणे सुकलेले असून वारा आल्यानंतर कधीही पडू शकते, अशा धोकादायक स्थितीत आहे. केडीएमसी वृक्ष प्राधिकरण विभागाला या सुकलेल्या धोकादायक झाडा बाबत तक्रार करून देखील दुर्लक्ष होत आहे.
संभाव्य अपघात घडला आणि वाहनांची रहदारी रस्त्यालगत असणाऱ्या या धोकादायक सुकलेल्या झाडामुळे संभाव्य अपघात घडला आणि जिवित हानी झाली तर त्यास जबाबदार कोण. मंगळवारी अवकाळी पाऊस सोसट्याच्या वाऱ्यामुळे कल्याण पूर्वेत रिक्षावर झाड पडल्याने तीन जणांचा दुर्दैवी मुत्यू झाल्याची घटना घडली. यातून प्रशासनाने बोध घेत संदर्भीत धोकादायक सुकलेले झाड काढणे देखील यानिमित्ताने गरजेचे आहे.
या धोकादायक सुकलेल्या झाडा संदर्भात माजी नगरसेवक मोहन उगले यांनी प्रसिद्धी माध्यामांच्या निर्देशनास आणून देत, उपआयुक्त, मुख्य उघान अधिक्षक, संजय जाधव यांना तक्रार दिली असून वारंवार पाठ पुरावा करून देखील संदर्भीत धोकादायक, सुकलेल्या झाडाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याची सांगितले. यानिमित्ताने या धोकादायक सुकलेल्या झाडाचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.


