केडीएमसीच्या "अ" प्रभागातील
बांधकामांवर तोडक कारवाईचा बडगा
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अ प्रभागाचे सहा.आयुक्त प्रमोद पाटील यांनी शनिवारी बल्याणी प्रभागातील उंभर्णी परिसरातील सुरू असलेल्या अनाधिकृत बांधकामावर धडक तोडक कारवाई सुट्टीच्या दिवशी केली. सुट्टीच्या दिवसाचा मोका साधून अनाधिकृत बांधकाम करणार्या भुमाफिया, चाळमाफियांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे. अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी
अनाधिकृत बांधकामावर पाडकाम कारवाई सुरू ठेवत असून शनिवारी बकरी ईद सुट्टीच्या दिवशी बल्याणी प्रभागातील उंभर्णी येथील 6 अनाधिकृत जोते, बांधकाम, 3अनाधिकृत रूमचे बांधकाम जमीन दोस्त केले. हि कारवाई महापालिका अधिकारी व कर्मचारी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जेसीबी व मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.


