शहाराच्या विदुप्रीकरणात भर घालणाऱ्या अनाधिकृत बँनर, पोस्टरवर केडीएमसीची कारवाई
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण डोंबिवली मनपाक्षेत्रातील ड प्रभागात अनाधिकृत बँनर, पोस्टर्स यामुळे रस्ते, चौक यांच्या विदुप्रीकरणात भर पडत होती. शहराचे सौदंर्यीकरण राखण्यासाठी ड प्रभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश यमगार यांच्या अनाधिकृत कारवाई पथकाने मंगळवारी धडक कारवाई करीत रस्त्यावरील, चौकातील 74 अनाधिकृत बँनर पोस्टर हटविले. अनाधिकृत पोस्टर बँनर यांचा रस्त्यावरील, चौकातील विळखा हटवित परिसर अनाधिकृत बँनर पोस्टर मुक्त केला. सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत प्रचार साहित्य लावणे हे कायद्यानुसार गुन्हा आहे.
नागरिकांनी कोणतेही बॅनर किंवा पोस्टर लावण्यापूर्वी महापालिकेची अधिकृत परवानगी घ्यावी. अन्यथा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शहराचे सौंदर्य टिकवण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे. तसेच अनाधिकृत पोस्टर, बँनरवर कारवाई सुरूच असते अशी माहिती ड प्रभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश यमगार यांनी दिली.

