Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

संभाव्य नागरी आरोग्य प्रश्न ऐरणीवर



 टिटवाळा गणेश मंदिर रस्त्यावर भुमिगत मलवहिन्याचे पाणी रस्त्यावर                  

 संभाव्य नागरी आरोग्य प्रश्न ऐरणीवर 

     

   कलम भूमी , कल्याण प्रतिनिधी ,       

   कल्याण : केडीएमसीच्या अ प्रभागक्षेत्रातील टिटवाळा स्टेशन ते गणेश मंदिर मुख्य रस्त्यात असणाऱ्या भूमिगत मलनिस्सारण वहिन्याच्या चेंबर मधील पाणी चोकअप झाल्यामुळे रस्त्यावर वाहत आहे. पावसाळा सुरू असून या रस्त्यावरून ये जा करणार्या नागरिकांना दुर्गंधी युक्त पाण्यातून वाटचाल करावी लागत आहे. त्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.       टिटवाळा रेल्वे स्टेशन ते गणेश मंदिर रोड मुख्य रस्त्यावर गेले कित्येक महिने हे  अंडर ग्राऊन्ड  ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. मलनिस्सारण वाहिन्यांमध्ये चोकअप झाल्यामुळे रस्त्यातील चेंबराच्या झाकणातून  दुर्गंधी युक्त पाणी वाहत असून रस्त्यावरून होणाऱ्या वाहनांची वर्दळ रस्त्यावरून ये जा करणार्या नागरिकांना या दुर्गंधी युक्त सांडपाण्यातून ये जा करण्याची वेळ प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे आली आहे.

या संभाव्य सांडपाण्यातून होणाऱ्या संसर्ग जन्य आजाराला सामोरे जाण्याची वेळ सर्वसामान्य करदात्या नागरिकांवर आली असल्याने याबाबत प्रशासन समस्या कधी मार्गी लावणार अशी मागणी जोर धरू पाहत आहे.  तर "कर्मचाऱ्यांना , अधिकाऱ्यांना हेच कळत नाही की नक्की चोक अप कुठे झाले, रस्त्याच्या आत मध्ये चेंबर कुठे आहेत याचा पत्ता नाही आणि हे सर्व मलनिस्सारण वहिन्या आरखडा उपलब्ध नसल्यामुळे घडत असावे.   कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही भारतातील एकमेव महानगरपालिका असेल जिथे सर्व कामे अनागोंदी पद्धतीने झालेली आहेत व होत आहेत. आता हे ड्रेनेजचे काम व रस्त्याची कामे महापालिकेनेच केलं मग केडीएमसीचा बांधकाम विभाग, जनि, मनि, पाणी विभाग एकमेकांमध्ये संवाद समन्वय ठेवत नसल्याने असे प्रॉब्लेम नेहमी येत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख विजय देशेकर यांनी  केला आहे. तर हा प्रश्न लवकरच तातडीने मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.