कल्याण प्रेस क्लबचे सचिव विष्णू कुमार चौधरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
कलम भूमी कल्याण-डोंबिवली, प्रतिनिधी ,
कल्याण प्रेस क्लबचे सन्माननीय सचिव आणि वरिष्ठ पत्रकार विष्णू कुमार चौधरी यांचा ६८ वा वाढदिवस उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या खास प्रसंगी त्यांना केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पत्रकार क्षेत्रात त्यांनी गेली अनेक वर्षे सतत कार्यरत राहून उल्लेखनीय योगदान दिले आहे.
त्यांनी पत्रकारितेमार्फत गरीब आणि वंचितांच्या समस्या सातत्याने मांडून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक भान आणि जनतेच्या प्रश्नांवरील त्यांची धारदार भूमिका यामुळे ते कायम अग्रभागी राहिले आहेत.
विष्णू कुमार चौधरी हे स्वतःचे "गुजराती साप्ताहिक" या वर्तमानपत्राचे संपादक असून त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य पत्रकार घडले असून, ते पत्रकार बांधवांमध्ये एक आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत.
गुजराती समाजात त्यांना विशेष मान्यता लाभलेली असून, ते एक सन्माननीय व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या योगदानाबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात कल्याण-डोंबिवलीतील अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सर्वांनी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी जीवनाची शुभेच्छा दिल्या.

