पत्रकार नारायण सुरोशी यांच्या वाढदिवसानिमित्त अंध व अपंग व्यक्तींना छत्री वाटप
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण – पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे व समाजकार्याची बांधिलकी जपणारे ज्येष्ठ पत्रकार नारायण सुरोशी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत अंध व अपंग गरजू व्यक्तींना छत्री वाटप करण्यात आले.
ही उपक्रम कल्याण येथे पार पडला. या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रीय पत्रकार समितीच्या वतीने करण्यात आले. यावेळी सुरोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
गरिब आणि गरजू अंध व अपंग व्यक्तींना छत्रीचे वाटप करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. या प्रसंगी कल्याण डोंबिवली महानगरपालिका, पत्रकार संघ व पत्रकार मित्रमंडळींनी सुरोशी यांना वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात कल्याण डोंबिवली महापालिकेचे सचिव किशोर शेलके, पत्रकार संघाचे पदाधिकारी व अनेक पत्रकार मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण होते आणि सामाजिक बांधिलकीचे सुंदर उदाहरण घालून दिले गेले.


