सत्तेचा माज की लोकशाहीचा अपमान.
भाजपकडून संविधानाची धट्टा, काँग्रेसकडून मामा पगारांचा संविधानिक सन्मान
संविधानिक वस्त्रं घालून लोकशाही वाचवू – हर्षवर्धन सपकाळांची गर्जना
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
देशात आज सत्तेचा माज इतका वाढला आहे की, लोकशाहीचे मूल्य आणि संविधानाची प्रतिष्ठा यांचा उघडपणे चुराडा केला जात आहे. या सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज डोक्यात गेला आहे, आणि भाजपकडून सुरू असलेली ठोकशाही आता संविधानालाच आव्हान देत आहे, असा ज्वालाग्राही हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
प्रकाश पगारे या काँग्रेस कार्यकर्त्याला भाजप पदाधिकाऱ्यांनी साडी नेसवून सर्वांसमोर अपमानित केल्याची घटना ही केवळ एका व्यक्तीचा नाही, तर लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया सपकाळ यांनी दिली.
या अमानवी कृत्याविरोधात काँग्रेसने कल्याणमधील डीसीपी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले. भाजप पदाधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करा, अशी काँग्रेसची ठाम मागणी आहे.
या आंदोलनादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी मामा पगारे यांना खांद्यावर उचलून सन्मानित केले आणि त्यांना संविधानाची प्रतिमा व भगवान बुद्धांची मूर्ती भेट दिली.
“आज संविधानाचं वस्त्रहरण सुरू आहे, पण आम्ही संविधानिक वस्त्रे परिधान करून लोकशाही वाचवू!” – असा तडाखेबाज इशारा सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.
या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महासचिव नवीन सिंह, सचिव सुरेंद्र आढाव, राजाभाऊ पातकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष जपजित माटा, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, तसेच शकील खान, मुन्ना तिवारी, विमल ठक्कर, प्रवीण साळवे आदी नेते उपस्थित होते.
सत्ताधाऱ्यांवर प्रहार करत काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी खालील मत व्यक्त केले,ते म्हणाले,,,,
आम्ही देशाला स्वातंत्र्य दिलं, पण आज हेच लोक स्वातंत्र्य हिरावून घेत आहेत. संविधानाचा अपमान करून ते आपल्या अहंकाराचा गजरा मिरवत आहेत.
जनतेत या प्रकरणावर तीव्र संताप असून भाजपकडून केलेल्या अपमानाची सर्व थरातून निंदा होत आहे. लोक म्हणतायत ही सत्ता नाही, ही दादागिरी आहे,असे मत कल्याण जिल्हा कार्य अध्यक्ष राजा भाऊ पातकर यांनी व्यक्त केले आहे,


