कल्याण पश्चिमेत नव्या रुग्णालयांची उभारणी
राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर साहेब यांची घेतली भेट
कल्याण:कल्याण पश्चिमेतील वाढती लोकसंख्या पाहता भविष्याचा विचार करता इथल्या आरोग्य यंत्रणेमध्ये सुधारणा होणे आवश्यक बनले आहे. या पार्श्वभूमीवर*
*•कल्याण पश्चिमेमध्ये महिला आणि बाल रुग्णालय,*
500 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यासह रुक्मिणीबाई रुग्णालयात ट्रॉमा केअर सुविधा सुरू करण्याची मागणी युवासेना जिल्हा चिटणीस वैभव विश्वनाथ भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर साहेब यांची भेट घेत निवेदन सादर केले.*कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा चोहोबाजूंनी वाढत आणि विस्तारत आहे. रस्ते आणि रेल्वेच्या चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे याठिकाणी राहण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मात्र इतक्या मोठ्या लोकसंख्येला आवश्यक असणारी शासकीय आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागली आहे. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात नव्या आरोग्य यंत्रणांची नितांत आवश्यकता आहे.*
*ही गरज ओळखून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात नविन शासकीय महिला आणि बाल रुग्णालय मंजूर करणे,कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात 500 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारणे आणि रुक्मिणीबाई रुग्णालयात ट्रॉमा केअर सुविधा मंजूर करण्याची मागणी वैभव भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी यासंदर्भात त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर साहेब यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.*
