सांडपाणी घरात शिरल्याने लहुजी नगर मधील नागरिकाचे जीवन विस्कळीत - रस्ता रोको आंदोल आश्वासन दिल्याने तूर्तास मागे
कल्याण : प्रतिनिधी
कल्याण कसारा रेल्वे मार्गाच्या कामादरम्यान येथील सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी बंद केल्याने मोहने लहुजी नगर परिसरात सांडपाण्याची समस्या गंभीर बनली आहे. लवकरच पावसाळा जवळ आल्याने ही समस्या आणखी वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना आरोग्य विषयी अडचणीला सामोरे जावे लागत आहे. परिसरातील लहान मुले वृद्ध नागरिक आणि कुटुंबासाठी ही परिस्थिती अधिकच त्रासदायक ठरत आहे. तसेच काही घरांमध्ये सांडपाणी शिरल्याने घरातील वस्तूचे नुकसान झाले आहे. या समस्याच्या निराकारण्यासाठी नागरिकांनी वारंवार महापालिका आणि रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी केल्या. मात्र अद्याप कोणतेही ठोस पावले उचलण्यात आलेले नाही. लहुजी नगर परिसरातील नागरिकांच्या समस्या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहर उपाध्यक्ष संध्याताई साठे यांनी केला आहे. लहुजी नगर मधील नागरिकांच्या समस्या कडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने स्थानिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संध्याताई साठे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्या बैठक घडवून आणण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. सात दिवसात समस्या सुटली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
