भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिन महापालिकेत उत्साहात साजरा
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीदिना निमित्त आज महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी महापालिका मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचप्रमाणे कल्याण पश्चिमेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासही आयुक्त अभिनव गोयल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी महापौर रमेश जाधव, उपआयुक्त अवधुत तावडे, संजय जाधव, कार्यकारी अभियंता अशोक घोडे, सहा.आयुक्त धनंजय थोरात, राजेश सावंत, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, 3/क प्रभाग अधिक्षक ज्ञानेश्वर कंखरे, सुरक्षा अधिकारी भरत बुळे, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच इतर अधिकारी/ कर्मचारी वर्ग तसेच उपस्थित नागरिक यांनी देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास पुष्पसुमने वाहून अभिवादन केले.
महापालिकेच्या डोंबिवली विभागातही परिमंडळ-2 चे उप आयुक्त रमेश मिसाळ यांनी जुन्या विभागीय कार्यालयाजवळील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आणि फ प्रभाग कार्यालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, सहा.आयुक्त हेमा मुंबरकर, संजयकुमार कुमावत, 6/फ प्रभागाचे अधिक्षक जयवंत चौधरी, स्वच्छता अधिकारी शरद पांढरे तसेच इतर अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते.
कल्याण पूर्व येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रभाग क्षेत्र कार्यालय परिसरात (ड प्रभाग) असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उप आयुक्त अतुल पाटील, सहा.आयुक्त उमेश यमगर, 5/ड प्रभागाचे अधिक्षक मधुकर भोये त्याचप्रमाणे इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.


