विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे भव्य लोकार्पण,
कलम भूमी,कल्याण : प्रतिनिधी
कल्याण पूर्व येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे भव्य लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे उद्योगी मंत्री उदय सामंत,सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या शुभहस्ते आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या ऑन लाईन विशेष उपस्थितीत १३ एप्रिल २०२५ संपन्न झाले. यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट याच्या उपस्थिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ऑन लाईन माध्यमातून विशेष उपस्थित दर्शवली.तसेच आमदार विश्वनाथ, भोईर आमदार राजेश मोरे , आमदार सुलभा गायकवाड, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे,आर पी आय नेते दलित मित्र अण्णासाहेब रोकडे,माजी नगरसेवक अरविंद मोरे,नीलेश शिंदे,माधुरी काळे, छायाताई वाघमारे,कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख प्रशांत काळे महेश गायकवाड,कल्याण डोंबिवली परिसरातील भीम अनुयायी कार्यकर्ते पदाधिकारी याच्या प्रमुख उपस्थितीत तसेच कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, अतिरिक्त आयुक्त १ हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी मालमत्ता विभागाचे रमेश मिसाळ, महा पालिका सचिव किशोर शेळके कार्यकारी अभियंता विद्युत प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता बांधकाम जगदीश कोरे उपस्थित व सौजन्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात उद्योग मंत्री उदय सामंत,सामाजिक न्याय मंत्री संजय
शिरसाट यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे आणि कार्याचे स्मरण करून नागरिकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाच्या महामंत्र उद्देश संदेश दिला असून १४ एप्रिल च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जनतेस हार्दिक शुभेच्छा दिल्या,
या ज्ञान केंद्राचे सुमारे १३९.९१ चौ.मी. क्षेत्रफळाच्या एल आकारात उभारण्यात आलेल्या या ज्ञान केंद्राचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ ५३९.९१ चौ.मी.इतके आहे. या वास्तूच्या पहिल्या मजल्यावर आठ फूट उंचीचा सुशोभित चबुतरा असून त्यावर सुमारे १२ फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या ज्ञान केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र, शिक्षण, सत्याग्रह, राजकीय कारकीर्द याविषयीची माहिती पॅनल्स, बॅकलिट डिस्प्ले थ्रीडी पॅन होलोग्रफी आणि फ्लिपबुक टेक्नॉलॉजीच्या साह्याने सादर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे होलोग्रफिक माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नागरिकांची संवाद साधत असल्याचा प्रभावी अनुभव येते मिळणार आहे. ज्ञान केंद्रात वाचण्यासाठी सुमारे १२०० पुस्तके आणि बुक्स उपलब्ध असून, हे केंद्र अभ्यासक, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी एक समृद्ध माहिती केंद्र ठरले आहे . किती वाजता महापालिकेच्या अभिमानात बल घालणारी आणि सामाजिक शिक्षणाला चालना देणारे ठरणार आहे.


