अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस आक्रमक
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या नेत्तृत्वाखाली सफाई कामगारांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, म. फुले चौक येथून या मोर्चाला सुरवात होऊन महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा धडकला
केडीएमसीमध्ये कामगारविरोधी निर्णय सफाईच्या कामासाठी एकूण ७ प्रभागात चेन्नई पॅटर्नच्या माध्यमातून मोठा ठेका सफाई कामात आणण्याचा घातकी निर्णय घेण्यात आलेला आहे. सफाईचे काम हे १२ माही दैनंदिन काम असल्यामुळे त्यात ठेका आणता येत नाही तसेच कॉन्ट्रॅक्टर रेग्युलेशनाईज अॅन्ड ऑबोलाइजेशन अॅक्ट १९७० प्रमाणेसुद्धा अशा पध्दतीने ठेकेदारीप्रथा आणणे गैरकृत्य आहे. यासाठी महाराष्ट्र शासन कामगारमंत्री तसेच लेबर कमिशनर यांच्याकडे रितसर तक्रार नोंदविण्यात आली आहे. मुख्य सचिव नगरविकास प्रधान सचिव यांच्याकडे संबंधित प्रकरणावर पत्रव्यवहार करून केडीएमसीच्या सफाई कामगार विरोधी धोरणावर नियंत्रण ठेवण्याच्या बाबतीत संघटनेने लेखी प्रस्ताव सादर केलेला आहे.
लाड कमिटीच्या अनुषंगाने रोजंदारीवर सफाई कामगारांची रीतसर भरती शासनाच्या धोरणानुसार न करता करोडो अब्जो रूपये ठेकेदार कार्यपध्दतीवर केडीएमसीच्या तिजोरीतून बेकायदेशीरप्रमाणे उधळपट्टी करणे सुरू करण्यात आले आहे. याबाबतीत १३ मार्च रोजी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष, नवी दिल्ली तसेच राज्याचे सर्व प्रधान सचिव सहीत नगरविकास खात्याचे प्रधान सचिव समोर अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस यांच्यामार्फत ठेवण्याच्या बाबतीत विरोध करण्यात आलेला आहे.
केडीएमसीने त्वरित हा ठेका रद्द करावा व रोजंदारी सफाई कामगारांची नियुक्ती करावी अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियनच्या माध्यमातून आयुक्तांना करण्यात आली. या मोऱ्यांचे नेतृत्व ज्येष्ठ कामगार राष्ट्रीय नेते चरणसिंह टाक यांनी केले.
