कल्याण पूर्वमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या स्वाक्षरी मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी स्वाbक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेचा उद्देश बोधगया महाविहार कायदा १९४९ रद्द करावे, महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी आहे. या मोहिमेची सुरुवात सूर्या शाळेजवळील रत्न सागर बुद्ध विहारमधील तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना हार अर्पण करून करण्यात आली. सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ते रुपेश हुंबरे यांच्या पुढाकारातून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
या उपक्रमाला सर्व स्तरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विभागातील बहुसंख्य महिला, पुरुष आणि विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. या स्वाक्षरी मोहिमेत वंचित बहुजन महिला आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष माया कांबळे, निलम तांबे, शितल तांबे, कल्याण पूर्व युवा आघाडी अध्यक्ष प्रकाश घोंगडे, प्रफुल्ल साळवे, गणेश शिंदे, देवानंद कांबळे, विक्रांत इंगळे, डी.एम. गायकवाड, अनिल खरात, भारतीय बौद्ध महासभेचे विठ्ठल मस्के, अशोक हुंबरे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


