खडवली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी मोठ्या उत्साहात
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
विश्वरत्न आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्सव कमिटी आणि नालंदा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विदमाने संत तुकाराम महाराज चौक खडवली पश्चिम येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी सरपंच वंदना सोनवणे यांनी भूषवले. या कार्यक्रमाच्या पारंबी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बौद्धचार्य विनोद पवार यांनी बुद्ध वंदना सादर केली. याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम, माजी सरपंच दिपाली शेलार ,अजय सावंत ,मंगेश शेलार ,कवी भालके ,सुभाष गंधे, व्याख्याते संजय चौधरी, बाळा शेख, उपप्राचार्य प्रशांत तांदळे, संजय पाटोळे ,मनीष अग्निहोत्री ,संजय जाधव ,किरण सूर्यवंशी ,व्यंकेश कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी कोळीवाडा टेप येथून निघालेल्या भव्य मिरवणुकीने वातावरण उत्सवी केले. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील , सरपंच प्रियंका राऊत नडगावचे माजी उपसरपंच शेखर लोणी यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. या मिरवणुकीचा संविधान चौक येथे समारोप झाला. या मिरवणुकीत खडवली परिसरातील बहुजन बांधव व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जयंती महोत्सव कमिटीचे उपाध्यक्ष सुनील भोईर ,निशांत रातांबे ,निलेश गायकवाड ,विकी जाधव ,प्रथमेश जावडेकर, संदीप जाधव ,अजय चव्हाण ,प्रदीप चव्हाण ,दीपक सोनवणे, संजय सोनवणे ,महेंद्र ननवारे यांनी आयोजन यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला.कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये म्हणून कल्याण तालुका टिटवाळा ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून मिरवणुकी यशस्वीरित्या शांततेत पार पाडली.
