पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मदत कार्य,
कलम भूमि, कल्याण प्रतिनिधी,
डोंबिवलीतील दुकानदारांनी दुकानें बंद ठेऊन निषेध व्यक्त केला.
मृतांना भाव पूर्ण श्रद्धाजंली वाहिली,
जम्मू काश्मीरमधील येथील बेसरण टेकडीवर २२ एप्रिल २०२५ रोजी दुपारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. पोलीस देशात आलेल्या दहशतवाद्यांची जंगलाने वेढलेल्या मैदानात अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू झाला इतर सहा जण आश्चर्यकारक बचावले आहेत. मृतामध्ये संजय लक्ष्मण लेले वय ५२ वर्ष, जयश्री अपार्टमेंट नवापाडा चौक, हेमंत जोशी वय ४३ आणि अतुल मोने वय ४४ वर्ष राहणार सम्राट चौक यांचा समावेश आहे. हे पर्यटक आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी काश्मीरला गेले होते. संजय लेले यांचा मुलगा किरकोळ जखमी झाला असून इतर नातेवाईक सुखरूप आहेत. ही घटना कळताच डोंबिवलीतील नागरिकाकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी तात्काळ श्रीनगरकडे रवाना होऊन मदत कार्य सक्रिय सहभाग घेतला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यक अभिजीत दरेकर यांना श्रीनगरला पाठवून जखमी व अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी तात्काळ यंत्रणा कार्यान्वित केली. राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा ही यामध्ये सक्रिय झाल्या असून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, आमदार राजेश मोरे, आमदार रवींद्र चव्हाण, कल्याण तहसीलदार सचिन शेजळ हे सतत संपर्कात आहेत. ही घटना महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी असून एकाच कुटुंबातील तीन सदस्य गमवणे ही मोठी शोकांतिका ठरली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सहकाऱ्यांनी उर्वरित पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

