Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

रवी गिते यांची कोकण विभागीय माहिती उपसंचालकपदी पदोन्नती


रवी गिते यांची कोकण 

विभागीय माहिती उपसंचालकपदी पदोन्नती

कोंकण विभागीय माहिती उपसंचालक  पदाचा स्विकारला पदभार,

कलम भूमि, ठाणे प्रतिनिधी,

– माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ अधिकारी रवी गिते यांनी आज कोकण विभागीय माहिती उपसंचालक या पदाचा कार्यभार स्वीकारला. नवी मुंबईतील कोकण भवन येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात प्रभारी उपसंचालक श्रीमती अर्चना शंभरकर यांच्याकडून त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला.

याप्रसंगी ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, कोंकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला, सहायक संचालक संजिविनी जाधव-पाटील, उपसंपादक प्रविण डोंगरदिवे, पत्रकार मच्छिंद्र पाटील, कोंकण विभागीय कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

सामान्य प्रशासन विभागाच्या २२ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील सात वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपसंचालक (माहिती) पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. या यादीत जिल्हा माहिती अधिकारी, वर्धा म्हणून कार्यरत असलेले रवी गीते यांचाही समावेश आहे.

श्री. गिते यांचे पत्रकारितेपासून शासकीय सेवेपर्यंतचे प्रवास अत्यंत उल्लेखनीय ठरले आहेत. शासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी लोकपत्र, नवराष्ट्र आणि सामना या प्रमुख दैनिकांत पत्रकार म्हणून कार्य केले. त्यांच्या पत्रकारितेतील अनुभवाचा त्यांनी माहिती विभागातील सेवेमध्ये प्रभावीपणे उपयोग केला आहे.

शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रात सहायक संचालक म्हणून सुरुवात केली. त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून यशस्वीपणे कार्य केले. सध्या ते वर्धा जिल्ह्यात जिल्हा माहिती अधिकारी या पदावर कार्यरत होते.

त्यांच्या पदोन्नतीनंतर आता त्यांनी कोकण विभागीय माहिती उपसंचालक या नव्या आणि जबाबदारीच्या पदावर रुजू होत कोकण विभागातील शासकीय माहिती व्यवस्थापनाला अधिक सक्षम दिशा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यांच्या कार्यकुशलतेचा आणि अनुभवाचा फायदा कोकण विभागाला निश्चितच होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.