महापालिका आयुक्त अभिनय गोयल यांनी दिली टिटवाळा येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या उद्यानाला भेट ,
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
टिटवाळा, नारायण नगर येथे 3500 चौ मी क्षेत्रफळावर विकसीत करण्यात आलेल्या उद्यानाची महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पाहणी केली आणि तेथील सुमारे 3500 झाडांची लागवड केलेले मानवनिर्मित जंगल , लहान मुलांसाठी बसविण्यात आलेली खेळणी आणि जेष्ठ नागरिकांकरिता उपलब्ध केलेली व्यायामाची साधने इ. सुविधांचा आढावा घेतला आढावा .सदर उद्यान लवकरच नागरिकांसाठी खुले होणार आहे. यावेळी मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव उपस्थित होते .

