राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन ,
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जयंती दिन तसेच वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय तृतीया ) तिथीनुसार "महात्मा बसवेश्वर यांचा जयंती दिन आज महापालिकेत संपन्न झाला. महापालिका मुख्यालयात आज त्यांच्या प्रतिमेस महापालिका आयुक्त अभिनव गोयल आणि अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या समयी उपायुक्त संजय जाधव, महापालिका सचिव किशोर शेळके, कार्यकारी अभियंता योगेश गोटेकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार यांनी *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज* आणि *महात्मा बसवेश्वर* यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करुन अभिवादन केले.
तसेच यावेळी उपस्थित समाजबांधव, नागरिक आणि महापालिकेच्या इतर अधिकारी व कर्मचारी वर्गाने देखील त्यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करुन अभिवादन केले.


