कल्याण डोंबिवली ग्रामीण विकासासाठी आयुक्तांना निवेदन - विकास कामातील अडथळे, नागरी समस्या आणि प्रशासकीय अपयश दूर करण्याची मागणी ,दीपेश म्हात्रे,
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ग्रामीण भागातील विकास कामे, नागरिक समस्या आणि प्रशासनातील अडथळा विषयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने २९ एप्रिल २०२५ रोजी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांना सविनय निवेदन सादर करण्यात आले. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ही भेट घेतली. निवेदनात वाहतूक नियोजनातील त्रुटी, अपूर्ण रस्ते, स्मार्ट सिटी व आरोग्य प्रकल्प, जलप्रकल्प व्यवस्थापन , जलवाहतूक सेवा, एलसी - १ रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम तसेच स्वच्छता आणि आपत्ती व्यवस्थापन आधी महत्त्वाच्या मुद्द्यावर भर देण्यात आला. वनवे सिस्टम सिक्रोनायझेशनची अंमलबजावणी करणे, अपूर्ण काँक्रीट रस्त्याचे वेळेत व स्वतंत्र यंत्रणा राबवणे, स्मार्ट सिटी आणि आरोग्य प्रकल्पाची गतीने अवलबजावणी करणे, डोंबिवली दुर्गाडी रिंगरोड साठी स्वतंत्र सल्लागार समिती स्थापन करणे, अमृत योजनेतील जल प्रकल्पाचे प्रभावी व्यवस्थापन स्थापन करणे, जलवाहतूक आर ओ - आर ओ ' सेवा सुरू करण्यासाठी अडथळे दूर करणे, सार्वजनिक सुविधा उद्याने वाचनालय, दवाखाने याचे नुतीकरण करणे, स्वच्छ भारत अभियान व कचरा मुक्त मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करणे, ठेकेदारावर कार्यक्षमतेचा दबाव, आपत्ती व्यवस्थापनासाठी व्यापक आराखडा तयार करणे, इत्यादी मागण्या महापालिका आयुक्त यांना सादर करण्यात आले. यावेळी दीपेश म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की २०१४ पासून महापालिकेतील कोणत्याही आयुक्तांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे प्रशासनात सातत्य राहिलेले नाही. सध्या आयुक्त अभिनव गोयल यांना पूर्ण कार्यकाळ देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केले आहे. कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे म्हणाले की ग्रामीण परिसरातील नागरिकांना अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत असून, या समस्यावर ठोस आणि तातडीच्या उपयोजना करण्याची गरज आहे. महापालिका आयुक्त यांनी सर्व मुद्दे समजून घेतले सकारात्मक कारवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

