खडवलीतील अनधिकृत बांधकामावर महसूल विभागाची धडक कारवाइ,
कलम भूमी, कल्याण, प्रतिनिधी
चाळीचे बांधकाम व जोते भुईसपाट
कल्याण : खडवली पुर्वेतील अनधिकृत बांधकामावर कल्याण तहसीलदार कार्यालया अंतर्गत महसूल विभागाने धडक कारवाई करुन चाळीचे बांधकाम व जोते फाऊंडेशन बांधकाम भुईसपाट केले आहे. यापुढेही अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई केली जाईल असे नायब तहसीलदार नितीन बोडके यांनी माहिती दिली.
खडवली पुर्व सर्व्ह नं 57/1अ व 57/2 या मध्ये अनधिकृत बांधकामे बांधण्यात आली होती. याबाबत जिल्हा अधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा अधिकारी आदेशानुसार अनाधिकृत बांधकामावर पथक प्रमुख नायब तहसिलदार नितीन बोडके व खडवली मंडळ अधिकारी दर्शना भावे यांनी जागेवर जाऊन अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली.
या कारवाईत बेहेरे खडवली ग्रामपंचायत, महावितरण कार्यालय, अग्निशामन दल, ग्राम महसूल अधिकारी, टिटवाळा पोलीस स्टेशन यांनी सहकार्य केले.
यावेळी पथक प्रमुख नायब तहसीलदार नितीन बोडके यांनी सांगितले की जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली असुन सात फाउंडेशन, जोते बांधकाम व चाळीचे बांधकाम तोडण्यात आले. यापुढेही अशीच धडक अनाधिकृत बांधकामावर कारवाई सुरू राहणार आहे.

