कल्याण डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यास लाच घेताना रंगेहात अटक
कल्याण,कलम भूमी प्रतिनिधी,
*****************************
कल्याण डोंबिवली महापालिकेतील आय प्रभाग क्षेत्रातील असलेल्या कर्मचारी पाटणे वय ५१ वर्ष यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ९ एप्रिल २०२५ रोजी दीड हजार रुपयाची लाज घेताना रंगेहात अटक केली आहे. एका नागरिकाने मॅरेज सर्टिफिकेट तात्काळ मिळण्यासाठी महापालिकेच्या आय प्रभाग क्षेत्र नागरिक सुविधा केंद्रात अर्ज केला होता. संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यासाठी दोन हजार रुपयाची मागणी केली होती. या प्रकरणात नागरिकाने लाच लुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. तडजोडीनंतर दीड हजार रुपये स्वीकारताना कर्मचारी पाटणे यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.