
डोंबिवलीतील तिघांच्या हत्येनंतर वन मंत्री गणेश नाईक यांची शोकांनजली भेट; म्हणाले अमानुष कृत्य देश कधीही विसरणार नाही
कलम भूमि ,कल्याण प्रतिनिधी
जम्मू काश्मीर पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्राचे वन मंत्री गणेश नाईक यांनी २५ एप्रिल रोजी डोंबिवलीत येऊन संबंधित कुटुंबाची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. प्रसार माध्यमांशी बोलताना नाईक म्हणाले,"डोंबिवलीवरील हा आघात म्हणजे देशावरील घाव आहे. या अमानुषपणे वागणाऱ्या लोकांना देश कधीही माफ करणार नाही. त्याच्या विरुद्ध जनतेच्या भावना उग्र असून,त्यांना योग्य ती शिक्षा मिळाली पाहिजे. आपल्याला मृत व्यक्ती परत मिळवता येणार नाही. पण त्याच्या मृत्यूनंतर समाजात जे दुःख व रोष पसरला आहे. त्यातून अशा दहशतवादी वृत्तीला भविष्यात धडा शिकवला जाईल.पत्रकारांनी शरद पवार यांच्या भाष्यबाबत विचारले असता,नाईक म्हणाले की ,"त्याबाबत मी कोणतीही प्रक्रिया देण्याची गरज समजत नाही.