कल्याणमध्ये सर्व पक्षीय व नागरिकांच्या वतीने कॅन्डल मार्च काढून भ्याड हल्ल्याचा निषेध,
कलम भूमि, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण शहरात सर्व राजकीय पक्षाच्या वतीने व कल्याणकर नागरिकांच्या वतीने जम्मू काश्मीर पहेलगाम येथे निष्पाप नागरिकांना आतंकवाद्यांनी जिवे मारल्याच्या विरोधात देश हितासाठी आपली एकता दाखवून सर्वांनी मिळून गुरुवारी कॅन्डल मार्च काढला होता. आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व भारतातून आतंकवाद्यांना समूळ नष्ट करावे म्हणून त्या संदर्भात राष्ट्रीपती यांना कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
हम सब एक है, भारत माता की जय, पाकिस्तान मुरदाबाद अशी घोषणा देत हा कॅन्डल मार्च कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्याना पर्यंत काढण्यात आला. या कार्यक्रमात माजी आमदार प्रकाश भोईर, कल्याण कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जगताप, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी सचिव नोवेल साळवे, कल्याण व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विजय पंडित, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा संघटक रूपेश भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या सत्यभामा जयस्वार, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संतोष रोकडे, प्रविण गुंजाळ, रामदास वळसे पाटील, राजु पांडे, विशाल दामले, अशोक राजपूत, कुसुम गेडाम, आणि मोठ्या संख्येने इतर पक्षातील पदाधिकारी व कल्याणकर नागरीक उपस्थित होते.

