बुद्धिबळ स्पर्धेत डोंबिवलीच्या होली एंजल्स तर बॅडमिंटनमध्ये कल्याणच्या सेंट लॉरेन्स शाळेचे वर्चस्व
'कल्याण ट्रॉफी डिस्ट्रिक्ट गेम्स'
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : 'कल्याण ट्रॉफी डिस्ट्रिक्ट गेम्स' अंतर्गत कल्याणमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये बुद्धिबळ स्पर्धेत डोंबिवलीच्या हॉली एंजल्स शाळेने तर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये कल्याणच्या सेंट लॉरेन्स शाळेने वर्चस्व प्रस्थापित केले. कल्याणच्या होली फेथ शाळेमध्ये संपन्न झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये होळी एंजलच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत 4 सुवर्ण 3 रोप्य 2 कांस्यपदक पटकावत स्पर्धेत आघाडी घेतली.
बॅडमिंटन स्पर्धेमध्ये कल्याणच्या सेंट लॉरेन शाळेने 5 सुवर्ण 3 रोप्य आणि 7 कास्य पदक पटकावत बाजी मारली. कल्याण ट्रॉफी डिस्टिक गेम्स अंतर्गत सुरू असलेल्या विविध स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यातील अनेक शाळा सहभाग घेऊन स्पर्धेला उदंड प्रतिसाद देत आहेत. या खेळांचे आयोजन स्पोर्ट्स केयर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले असून 1 मे पर्यंत हे डिस्टिक गेम्स चालणार आहेत. यामध्ये फुटबॉल, क्रिकेट, अॅथलेटिक्स स्केटिंग, हॉलीबॉल, रब्बी या खेळांचा समावेश करण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवलीमधील विविध शाळा आणि मैदानावर हे जिल्हा पातळीवरचे खेळ पार पडणार आहेत. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होली फेथ शाळेचे संचालक सुमित पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका रेशमी, क्रीडा शिक्षक राजू घुले, शलाका दातार, कोमल आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेला सुधांशू ठाकूर, आदित्य शेजवळ, अश्विनी, रुपेश यांचे सहकार्य लाभले.
बॅडमिंटन स्पर्धेत ओमकार भगत, निश्चित शेट्टी, सिद्धार्थ गांगुर्डे, आयुष कटके, इशिका जैस्वाल, दीक्षा सफारे, विधीता कश्यप, श्रेया परदेशी, अंश खेमाने, लक्ष लिंबाजी हे खेळाडू विजयी झाले आहेत. तर बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ बिरूद, अनिस कदम, दिवंशिका सिंग, राजदीप येवले, श्रीयान वारुळे, ऋग्वेद म्हात्रे, लक्ष खाडे, ध्रुव नांदगावकर, सर्वेश चौधरी तनिष्का तिवारी, अथर्व दामोदर, घुमरे, निधी सावलिया, व्हेज शेट्टी, मिहिरा बापला परिणीती उदगीर, खुशी शाहू, पलक कटारिया आदी खेळाडू विजयी झाले आहेत.

