पुना लिंक रोडवरील अपघात टाळण्यासाठी 100 फुटी रस्ता सुरु करण्याची मनसेची मागणी
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण पूर्वेतील पुना लिंक रोड येते अवजड वाहनांचे ब्रेक फेल होऊन अपघात होण्याच्या घटना वाढल्या असून या रोडवर होणारे अपघात टाळण्यासाठी 100 फुटी रस्ता सुरु करण्याची मागणी मनसेने केली असून याबाबत मनसेचे उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र दिले आहे.
कल्याण पूर्व परिसरातील १०० फुटी रोड हा कल्याण पूर्व परिसरातील पुना लिंक रोड वरील वाहतूक कमी करण्यासाठी एक महत्वाचा पर्याय आहे. परंतु हा रस्ता गेले कित्येक वर्ष प्रलंबित आहे. या रस्त्याचे बहुतांश काम हे पूर्ण झाले आहे. १०० फुटी रस्ता पूर्ण करून घेतला तर कल्याण पूर्व मधील गेले काही महिने सातत्याने मोट्या गाडीचे अपघात होत आहेत, सुदैवाने शाळांना सुट्टी असल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी होत नाहीये. १०० फुटी रस्ता पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला झाल्यास पुनालिंक रस्त्यावरील मोठ्या जड वाहनांची वाहतूक १०० फुटी रस्तावर वळवून होणारे अपघात कमी होऊ शकतात.
तरी १०० फुटी रस्ता हा पुनालींक रोड रस्त्याला रहदारीस पर्याय म्हणून होऊ शकतो. कल्याण पूर्व मधील पुना लिंक रोड वरील होणारे जीवघेणे अपघात कमी होतील. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी मनसेचे उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे यांनी केली आहे.


