Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

उल्हासनगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

 

उल्हस नदीत भराव टाकून नदीचा नाला नाम शेष  होत आहे 

 उल्हासनगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष 

कलम भूमी,उल्हासनगर प्रतिनिधी,

उल्हासनगर सध्या तरी वालधुनी नदीमध्ये भराव टाकून उल्हास नदीला नाल्याचे सुरुप आले असून सरकारी दरबारी उल्हास वालधुनीचा नाला असे उल्लेख होत आहे तसेच उल्हासनगर - ३ मध्ये सुध्दा खत्री भवन जवळ मिलिटरी कॅम्प होता या सरकारी जागेवर व मैदानामध्ये सध्यातरी काही भंगार माफीया  या ५ बाय  १० चे पत्रे  ठोकून या ठिकाणी जागा हळद करत असून गौशाला या नावाने सुद्धा त्या ठिकाणी पत्रा टाकून मोठ्या प्रमाणात जागा अतिक्रमण करत आहेत सरकारी जागेवर, उल्हासनगर महापालिका आणि प्रशासन आतातरी जागो जागो, तसेच उल्हास नदीच्या पात्रात अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण, जवळील मातीचा भराव टाकला जात असल्यामुळे पर्यावरण प्रेमी झाले आक्रमक नदीपात्रात मातीचा भराव टाकण्यात येत असल्याची तक्रार पर्यावरणाचेप्रेमीनी केली असून  या भरावमुळे जून महिन्यात पाऊस सुरू झाला की अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, आणि कल्याण शहरातील नदीच्या काठावरील नागरिकांच्या घरामध्ये पाणी घेतल्याशिवाय राहणार नाही तसेच लोकवस्तीत पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती मात्र निर्माण होणार,  

नागरीकरण वाढत असताना नदीचा नाला झाला नदीपात्रात सांडपाणी आणि रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याने महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त प्रदुषित नदी म्हणजे वालधुनी नदीची मात्र ओळख आता सध्यातरी झाली आहे सरकार दरबारी उल्हास वालधुनी नदीचा उल्लेख हा नाला असा केला जात आहे दरवर्षी अतिवृष्टी झाली की पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते त्यांना मात्र महापालिकेच्या शाळेत हलविले जाते आणि पाणी ओसरल्यावर घरी पाठविले जाते हे कधी थांबणार असा सवाल मात्र उपस्थित केला जात आहे आता तर उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले असून एम एम आवडीच्या माध्यमातून विठ्ठलवाडी ते शहाड उड्डाणपुलाचे काम हे सुरु आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.