अखेर पेंढारकर कॉलेजवर प्रशासकाची नियुक्ती
सेव्ह पेंढारकर कॉलेज मोहिमेला यश
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : अनुदानित असलेले पेंढारकर कॉलेज विनाअनुदानित करण्याचा घाट घातल्याने पेंढारकर कॉलेज वाचवण्यासाठी सेव्ह पेंढारकर कॉलेज मोहिमे अंतर्गत गेल्या 10 महिन्यांपासून कॉलेज समोर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि डोंबिवलीकर नागरिक यांचे उपोषण सुरू होते. त्यांच्या या लढ्याला यश आले असून अखेर पेंढारकर कॉलेजवर प्रशासकाची नियुक्ती करण्याचे आदेश प्र. शिक्षण संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी काढले आहेत.
शासनाच्या या निर्णयानंतर पेंढारकर कॉलेज बाहेर सेव्ह पेंढारकर मोहिमेचे सोनू सुरवसे आणि त्यांच्या सह कॉलेजचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि डोंबिवलीकर नागरिकांनी जल्लोष साजरा केला. यावेळी त्यांनी गुलाल उधळत, फटाके फोडत, बँडच्या तालावर नाचत आपला आनंद व्यक्त केला.
पेंढारकर कॉलेज प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात पेंढारकर कॉलेज बचाव समितीच्या माध्यमातून पेंढारकर कॉलेज डोंबिवली जे मूळ अनुदानित आहे, ते विनानुदानित करण्याचा कॉलेज प्रशासनाचा कट आहे. या विरोधात पेंढारकर कॉलेज बचाव समिती तर्फे गेल्या 10 महिन्यांपासून साखळी उपोषण आंदोलन सुरू होते.


