Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे पहलगाम येथिल भ्याड हल्ल्याचा जाहिर निषेध


राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे पहलगाम येथिल भ्याड हल्ल्याचा जाहिर निषेध,


कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,

कल्याण :  काश्मीरमधील  पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला, यामध्ये पर्यटकांवर गोळ्या झाडण्यात आल्या ,यामध्ये २७ पर्यटकांना आपला जिव गमवावा लागला व काही पर्यटकांवर अजून उपचार सुरू आहेत.

या निमित्ताने रमझान शेख प्रदेश संगठक सचिव राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार आणि  शहर अध्यक्ष  ज्ञानेश्वर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर येथे निषेध सभा व मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


तसेच याप्रसंगी रमझान शेख यांनी तीव्र शब्दात  आतंकवाद्यांबद्दल आपल्या  भावना व्यक्त केल्या, शरदचंद्र पवार यांनी विचार व्यक्त केले की सर्व विरोधी पक्ष यावेळी केंद्र सरकारच्या मागे भक्कमपणे उभे आहेत. काश्मीर तसेच आपल्या महाराष्ट्रातील कोकण हे पर्यटनासाठी प्रसिद्ध जागा आहेत. तरी पुढील काळासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पर्यटकांच्या सुरक्षेबद्दल कठोर पावले उचलावीत अशी भावना व्यक्त करण्यात आली.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.