Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

बी. के. बिर्ला नाईट कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावरील स्टार्टअप स्पर्धेत सहभाग


बी. के. बिर्ला नाईट कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावरील स्टार्टअप स्पर्धेत सहभाग

कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,

कल्याण : बी. के. बिर्ला नाईट कॉलेजच्या Incredible Thinker या विद्यार्थ्यांच्या चमूने "SBI College Youth Ideation 2025" या राष्ट्रीय स्तरावरील स्टार्टअप स्पर्धेत सहभाग घेतला. या चमूमध्ये  वंश शाह,  विक्रम चौधरी आणि  सचिन वर्मा यांचा समावेश होता, आणि त्यांना उद्योजकता सेलचे प्रमुख डॉ. रूपेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

स्पर्धेसाठी तांत्रिक समर्थन देण्यात धरणी मुदलियार आणि  लक्ष्मी सिंग यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते, ज्यांनी विद्यार्थ्यांना सशक्त तांत्रिक तयारीसाठी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी तयार केलेली "आयुररक्षा" ही आरोग्यसेवा संबंधित अभिनव कल्पना सादर करण्यात आली, ज्याचा उद्देश होता रुग्णांना तात्काळ अँब्युलन्स सेवा आणि वैद्यकीय मदत डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सहज उपलब्ध करून देणे. Ok

ही स्पर्धा तीन टप्प्यांत पार पडली. पहिल्या टप्प्यात निवडीनंतर विद्यार्थ्यांना त्यांची स्टार्टअप कल्पना एका रीलद्वारे सोशल मीडियावर सादर करण्याचे आव्हान दिले गेले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रीलला ३१ हजार हून अधिक लाईक्स, शेअर्स व कमेंट्स मिळाल्या, ज्यामुळे त्यांची दुसऱ्या टप्प्यासाठी निवड झाली.

दुसऱ्या टप्प्यात उत्पादन विक्री किंवा डिजिटल पिचिंगची जबाबदारी देण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत टॉप १०० संघांमध्ये स्थान पटकावले. त्यानंतर त्यांना थेट आयआयटी दिल्लीमध्ये गुंतवणूकदारांसमोर सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले.

दिल्लीतील अंतिम टप्प्यात विद्यार्थ्यांनी आयुररक्षा ही संकल्पना विविध गुंतवणूकदारांसमोर सादरीकरण केली. रुग्णवाहिकेसाठी Uber/Ola पद्धतीने सेवा देणारी ही प्रणाली, डॉक्टर उपस्थित असलेली वैद्यकीय मदत, विमा क्लेम, डिजिटल नोंदणी व तत्काळ उपचार यांसारख्या वैशिष्ट्यांनी भरलेली होती. दिल्ली सरकारच्या प्रतिनिधींनी या कल्पनेत रस दाखवला.

या उपक्रमात बी. के. बिर्ला नाईट कॉलेजचा Incredible Thinker संघ देशभरातून आलेल्या ४५,००० हून अधिक कल्पनांमधून अंतिम टॉप १०० मध्ये पोहोचला. या संधीद्वारे  वंश शाह,  विक्रम चौधरी व  सचिन वर्मा यांना स्टार्टअप संस्कृती, गुंतवणुकीचे महत्त्व आणि व्यावसायिक नेटवर्किंग याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. हा प्रवास केवळ स्पर्धा नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय क्षमतेच्या विकासाची सुरुवात ठरली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.