एमआयडीसीतील नाल्याचे काम निकृष्ट दर्जाचे
आमदार राजेश मोरे यांची उद्योग मंत्र्याकडे तक्रार
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
डोंबिवली : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली एमआयडीसी मधील नालेसफाईची पाहणी केली असता कंत्राट दराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे निदर्शनास आले आहे अनेक नाल्यात भराव टाकण्यात आल्याने नाले भरून गेले आहेत यामुळे पावसाळ्यात पाणी भरून नागरिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करत बेजबाबदारपणे निकृष्ट पद्धतीचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर तसेच संबंधित एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार राजेश मोरे यांनी केली आहे याबाबतचे पत्र उद्योग मंत्री उदय सामंत यांना दिल्याचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले
डोंबिवली एमआयडीसी परिसरात असलेल्या नाल्यांची सफाई पालिका प्रशासनाकडून तसेच एमआयडीसी कडून सुरू आहे मात्र रस्त्याच्या कामाच्या दरम्यान या नाल्यात एमआयडीसी कडून मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्यात आल्याने हे नाले बंद होण्याच्या मार्गावर आहेत पावसाळा तोंडावर आलेला असतानाही नाल्यातील भराव काढून नाल्याची साफसफाई करण्यात आलेली नाही तर उलट नालेसफाईचे काम ठेकेदाराकडून अतिशय निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचे सांगत आमदार मोरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे तसेच संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले



