अतिधोकादायक/धोकादायक इमारती कोसळून जिवीत व वित्तहानी होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी महा पालिकेच्या अधिकारांना दिले आदेश,
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
अतिधोकादायक/धोकादाय इमारती कोसळून जिवीत व वित्तहानी होणार याची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज त्यांच्या दालनात आयोजिलेल्या बैठकीत सर्व प्रभागांच्या सहा.आयुक्तांना दिले. यापूर्वी दि. 5 मे रोजी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी घेतलेल्या मान्सुनपूर्व आपत्कालीन बैठकीत या सूचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या. काल कल्याण पूर्व येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज सकाळी 9.30 वा. सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेवून आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या कार्यवाहीचा आढावा घेतला.

आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाची भूमिका महत्वाची असते, त्यामुळे अग्निशमन विभागाच्या कामकाजाबाबत SOP तयार करावी, आपत्कालीन कक्षात नेमणूक असणाऱ्या सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांना त्वरीत प्रशिक्षण देण्यात यावे. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीमध्ये लागणाऱ्या सर्व शासकिय यंत्रणांतील निगडीत अधिकारी/कर्मचारी वर्गाच्या दूरध्वनी क्रमांकाची यादी अद्यायावत ठेवावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.सर्व प्रभागांचे सहा.आयुक्त यांनी आपापल्या प्रभागातील शेल्टर होममध्ये विद्युत व्यवस्था, पाणी, शौचालय इ. सुविधा आहेत, याची खातरजमा करावी. महापालिका क्षेत्रातील नाले सफाई तसेच लहान गटारांची सफाई व्यवस्थित झाली असल्याची खातरजमा संबंधित अधिकाऱ्यांनी करावी. आरोग्य विभागाने आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सेवा देण्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येक प्रभागासाठी एका समन्वयक अधिकाऱ्याची नेमणूक करावी. बांधकाम विभागाने महापालिका परिक्षेत्रातील "क्रीटीकल पाँईंट" संदर्भात काय उपाययोजना लागणार आहेत, त्या अनुषंगाने कार्यवाही करावी. नोडल अधिकाऱ्यांनी आपआपल्या प्रभागात "मॉक ड्रील" घ्यावे, अशा अनेक सूचना महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या बैठकीत अधिकारी वर्गास दिल्या आणि आपत्कालीन कक्षातील अधिकारी/कर्मचारी यांनी कर्तव्यात कसूर अथवा निष्काळजीपणा केल्यास संबंधितांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर करणेबाबतच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.