स्व.राजीव गांधी यांच्या स्मृती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन
दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त घेतली प्रतिज्ञा !
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
महापालिका मुख्यालयात आज दहशतवाद व हिंसाचार विरोधी तसेच स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त महापालिका सचिव किशोर शेळके यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली या समयी पुनर्वसन विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त दत्तात्रय लदवा यांचे समवेत उपस्थित अधिकारी /कर्मचारी वर्गांने दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथ घेतली.
या समयी सुरक्षा अधिकारी भरत बुळे ,सहाय्यक सुरक्षा अधिकारी सुरेश पवार, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी सुमित बोयत तसेच महापालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

