दैनिक भास्कर च्या जन मंच कार्यक्रमात शहरातील विविध नागरिक समश्याचे निराकरण करण्यात आले
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन् आणी स्थानिक विविध पक्षातील कार्यकर्ते हे दैनिक भास्कर या हिंदी दैनिकांनी आयोजित जन मंच या मंचावर शहरातील वाढती गुन्हेगिरी, नागरिक समश्या इत्यादी विषयावर सखोल चर्चे द्वारे प्रश्न सोडविण्याचा प्रयन्त करण्यात आला,
कल्याण शहरातील विविध नागरिक समश्या व त्यामुळे सर्व् सामान्य नागरिकांना होणारा त्रास याची तक्रार कल्याण डोंबिवली महा पालिका प्रशासन सतात दुर्लक्ष करत असल्याचे मत नागरिकांनी मांडले ,कल्याण रेल्वे स्टेशन हे मुजोर रिक्षावल्यनि व्यापले असून महिला व वृद्ध प्रवश्याना स्टेशन मधून घरी जाने कठीण झाले आहे, कारण रिक्षा वाले हे नेहमी महिलांची अश्लील वर्तनूक करत असल्या सदर्भात पोलिसात अनेक तक्रारी दाखल केल्याची माहिती अनेक उपस्तितानि दिली परंतु पोलीस प्रशासना कडून कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने पोलीस प्रशासना विरुद्ध लोकांमध्ये असंतोष पसरत असल्याचे मत नागरिकानि व्यक्त केले ,
कल्याण शहरातील विविध भागातील
अनेक रस्त्याच्या खालून गेलेल्या ड्रेनेज हे नेहमी चॉक अप होत् असून त्या मधून दुर्गन्ध युक्त सांड पाणी रिस्त्यावर वाहात असल्याने नागरिकांना घाणीच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो याकडे पालिका प्रशासन कोणताच ठोस उपाय करत नसल्याचे मत संतप्त नागरिकांनी मांडले आहे, शहरात अनधिकृत बांधकाम सुरू असून महापालीका अधिकारी व भूमाफिया यांच्या आर्थिक व्यवहाराने रासरोज पणे सुरु असल्याची खंत नागरिकांनी जन मन कार्य क्रमात व्यक्त केली आहे कल्याण शहरातील वाढती गुन्हेगिरी, घरफोडी खून,बलात्कार चैन खेचून पळून जाणारे चोर शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे, यामुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे, असे अनेक प्रश्न सोडविण्या साठी महा पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन् सज्ज असल्याचे सांगण्यात आले,
कल्याण डोंबिवली महा नगर पालिकेचे सामान्य प्रशासनाच्या उपायुक्त वंदना गुलावे,यांनी जन मंच ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरिकांनी विचारलेल्या तक्रारी चे समाधान कारक प्रश्नाचे उत्तर दिले आहे नागरिकांच्या मूलभूत गरजा व देईनंदिन येणाऱ्या शहरातील विविध समश्या उदारनार्थ् पिण्याच्या पाणी समाश्या,रस्त्या वरील घाण पाणी ,सांड पाणी वाहने ,कचाऱ्याची समाशा नदी नाले यावर अनधिकृत बांधकाम होने,रिजर्व वेशन जागेवर अतिक्रमण करून टोळे जंग इमारतीचे बांधकाम करणे ,रस्त्यावरील फेरीवाल्यनि रस्त्यावर अतिक्रम किरणे ,कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील विविध समश्या इत्यादी महा पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शहरातील विविध नागरिक समश्या सोडविण्या साठी महा पालिका प्रशासन सतात वेळोवेळी कठोर कारवाई करण्यात येत आहे, नागरिक समश्या सोडविण्या साठी महा पालिकेत् येतात त्यांनी आपल्या तक्रारी ऑनलाईन देऊ शकतात, महापालिका चे समंधित अधिकारी हे दखल घेतात व आलेल्या तक्रारी चे निवारण करतात,असे मत महा पालिकेच्या प्रशासनाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी दैनिक भास्कर च्या जन मंच कार्यक्रमात व्यक्त केले आहे जन मंच कार्यक्रमात आलेल्या तक्रारी ह्या शहरातील नागरिक ,विविध पक्षाचे कार्यकर्ते यांनी प्रशासना समोर मंडल्या होत्या ,कल्याण शहाराचा विकास व स्मार्ट सिटी चे काम शहरात सुरु असल्याची माहिती महा पालिके तर्फे देण्यात आली ,त्या करता नागरिकांचे सहकार्य असाने आवश्यक आहे, नागरिकांच्या मूलभूत गरजा व तक्रारी चे समाधान करण्याचे आश्वसन उपायुक्त्या वंदना गुळवे यांनी दिले आहे,कल्याण डोबिवली महा पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रशासन अधिकरि ,कर्मचारी वर्गाला नागरिकांच्या समश्या त्वरित् सोडविण्याचे आदेश दिले आहे, पावसाळ्यात् होणाऱ्या समाश्याचे निवारण करण्या साठी मानसून संदर्भात बैठकीत दहा प्रभागात् काम करण्याचीसंधी आयुकातांनी माझ्यावर दिली आहे, नागरिकांनी दहा प्रभागातील अधिकारी व कर्मचार्यांचे कामाची माहिती व फोन नंबर महा पालिका व्यवस्थापन विभागात मिळेल ,असे महा पालिका उपायुक्त्या वंदना गुळवे यांनी सांगितले व जन मन कार्यक्रमात सहभागी झालेल्या नगरिकांचे अभार मानले, दैनिक भास्कर, व पत्रकारांचे मन पूर्वक अभार मानले गेले,
कल्याण डोंबिवली महा पालिका परिसरातील वाढती गुन्हेगारी चोरी बलात्कार अपघात घरफोड्या मोठ्या प्रमाणात होत आहे याची वेळोवेळी दखल घेतली जात आहे असे मत डीसीपी अतुल झेंडे यांनी तक्रारदारांना सांगितले राज्य शासनाने ठोस कायदा केल्याने गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात कमी करण्यात यश आले आहे गुन्हेगार कितीही मोठा असल्यास तरी कायद्यापुढे मोठा नाही असे मत झेंडे यांनी मांडले कल्याण बाजार पेठ पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ निरीक्षक सुरेश गोंड यांनी शहरातील गुन्हेगारींवर अंकुश असल्याचे सांगितले कल्याण स्टेशन परिसरातील गर्दुल्ले व गर्दा विकणारे अनैतिक धंदे करणारे व रिक्षावाले यांच्यावर वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे कल्याणच्या काही विशेष भागात ड्रग्स विक्रीचा धंदा जोरात चालू होता त्या
लोकांना कायद्याचा बडगा दाखवत त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे घरफोड्या नियोजित पद्धतीने केली जात असल्याचे समजते मुलांना शाळेच्या सुट्ट्या असल्याने व काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्याची बातमी घरफोड्यांना मिळते याचा फायदा घेऊन आजूबाजूला चोर चौकशी करत असतात म्हणून नागरिकांनी बाहेर गावी जाताना आपल्या मौल्यवान वस्तू व सोन चांदी पैसा व महत्त्वाची कागदपत्र बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याची विनंती श्री सुरेश गोंड यांनी केली आहे तक्रार दार हे शहरातील सुज्ञ नागरिक असून त्यांची आलेली तक्रार ही लगेच सोडवण्यात पोलीस सक्षम असतात, नागरिकांनीही आपली सुरक्षा कडे च्यायला लक्ष द्यावे 1980 व 90 च्या दरम्यान गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात होती ती गुन्हेगारी संपुष्टात आल्याचे निरीक्षक गोंड त्यांनी सांगितले खून बलात्कार व खंडणी च्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास येत आहे त्याचा देखील पोलिसा मार्फत योग्य रीतीने तपास लावून गुंडांना जेलमध्ये टाकण्यात आले आहे भारतीय राज्यघटनेत मध्ये 1435 कलमा नुसार नागरिकांचे मूलभूत कर्तव्य चे पालन केले जात आहे तुमच्या मनात जेवढे प्रश्न आहेत तेवढे प्रश्न
आमच्याही मनात असतात शहरात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याचे कार्य पोलीस प्रशासन सातत्याने करत आहे असे बाजारपेठ पोलीस ठाण्याचे मुख्य निरीक्षक श्री सुरेश गोंड यांनी व्यक्त केले दैनिक भास्कर च्या जन मंच कार्यक्रमात नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे व भास्कर समूहांनी असे कार्यक्रम प्रत्येक शहरात घेण्याची गरज असल्याचे मत श्री गोंड यांनी व्यक्त केले कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व तक्रार दारांचे पत्रकारांचे व कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचे आभार व्यक्त केले
दैनिक भास्कर या वृत्तपत्राच्या जन मंच कार्यक्रमात कल्याण चे डी सी पी, तथा बाजार पेठ पोलिस ठाण्याचे मुख्य निरीक्षक सुरेश गोंड ,महा पालिका उपायुक्त वंदना ताई गुळवे, दैनिक भास्कर चे पत्रकार दुबे व कल्याण डोंबिवली परिसरातील कार्यकर्ते आणि राजकीय व सामाजिक पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने कॉन्फरन्स हॉल आचार्य आत्रे येथे उपस्थित होते,
________________________________







