पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे यांना प्रथम क्रमांक
इ१०० दिवस कार्यालयीन सुधारणा मोहिमेत परिमंडळ ३ कल्याण यांची उत्कृष्ट कामगिरी " - पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे यांना प्रथम क्रमांक
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ,मुंबई यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या "१०० दिवसाची कार्यालयीन सुधारणा मोहीम " ( ७ जानेवारी २०२५ ते १६ एप्रिल २०२५ ) या कालावधीत ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात विविध प्रशासनिक सुधारणा व कार्यक्षमतेच्या निकषांवर आधारित मूल्यमापन करण्यात आले.या उपक्रमाच्या अनुषंगाने पोलिस उपायुक्त कार्यालय परिमंडळ ३,कल्याण मा.अतुल उत्तमराव झेंडे यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रथम क्रमांक बहाल करण्यात आला. सदर प्रमाणपत्राचे वितरण आज मा. पोलीस आयुक्त ठाणे शहर, मा. आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच इतर विभागातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सहायक पोलिस आयुक्त स्तरावर मा.सुहास हेमाडे ,डोंबिवली विभाग - प्रथम क्रमांक , मा. कल्याणजी
घेटकल्याण विभाग - तृतीय क्रमांक तसेच विभागीय पोलिस ठाणे स्तरावर मा.विजय कादबाने , मानपाडा पोलीस ठाणे परिमंडळ ३ - व्दितीय क्रमांक विविध प्रशासनिक सुधारणा व कार्यक्षमतेचा निकषांवर आधारित मूल्यमापन निदर्शनात पाहता निश्चित करण्यात आले आहे . या सन्मानामुळे परिमंडळ ३ कल्याणची कार्यक्षमता व जनतेप्रती असलेली सेवा - भावना अधोरेखित झाली आहे.हे यश महाराष्ट्र पोलिस दलातील शिस्तबद्ध आणि नागरिकाभिमुख कामकाजाची साक्ष देणारी ठरली आहे.

