कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण डोंबिवली परिसरात विविध विकास कामाची साखळी, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व खासदार श्री कांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन डोंबिवली येथील सावळा रांम क्रीडा संकुल येथे पार पडला
कल्याण डोंबिवली महापालिकेणे शहरातील सफई आधुनिक पद्धतीने करण्यासाठी मध्यप्रदेशातील इंदोर येथे कार्यरत असलेल्या सुमित एल्को कंपनीसी करार करण्यात आलेचे उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमात जाहीर केले आहे,तीनशे पेक्षा अधिक वाहनां तर्फे नविन तांत्रिक पद्धतीने कचरा उचलणे व त्याची विल्हेवाट करण्यात येणार असल्याचे उपमुख्य मंत्री शिंदेंनी यांनी सांगितले,या नंतर शहरात कचरा डेपो दिसणार नाही अशी ग्वाही देण्यात आली आहे,खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण येथे उप प्रादेशिक परिवहन नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले आहे,खासदार श्रीकांत शिंदे यांची भारताचे पंत प्रधान मोदी यांनी पाकिस्तानचा खरा चेहरा , व दहशत वादी कार्यवाही जगा समोर मांडण्याची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात योग्य प्रकारे केली जाणार असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले, व श्रीकांत शिंदे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील विविध विकासकामाचे उद्घाटन आणि भूमिपूजन १८ मे २०२५ रोजी होणार आहे. या कामामुळे परिसरातील नागरिक सुविधा अधिक सक्षम होणार असून, नागरिकांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या पूर्णत्वास येत असल्याचे मत उप मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे,कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांचे मन पूर्वक पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आहे खासदार श्रीकांत शिंदे यांचे देखील स्वागत महापालिके ने केले आहे,परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी मंत्री व भारतीय जनता पार्टी चे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार राजेश मोरे,आमदार सुलभा गायकवाड,आमदार विश्वनाथ भोईर,शिंदे गटाचे गोपाल लांडगे,रवी पाटील,इत्यादी प्रमुख भाजपा नेते व शिंदे गटाचे हजारो शिव सैनिक उपस्थित होते ,महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गोडसे,अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड , शहर अभियंता परदेशी मॅडम सामान्य प्रशासन च्या उपयुक्त वंदना गुळवे,मालमत्ता विभागाचे उपयुक्त रमेश मिसळ , कोरे,महा पालिका सचिव किशोर शेळके, इत्यादी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते,
यामध्ये डोंबिवलीतील घारडा सर्कलचे नामांतरण करून छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आश्रारुढ पुतळा येथे उभारण्यात आला आहे. मानपाडा येथे खासदार डॉ. शिंदे यांच्या पुढाकारातून खेळण्यासाठी सुविधा युक्त क्रीडा संकुलन उभारण्यात येणार आहे. तसेच, रिंग रोड टप्पा २ अंतर्गत बाधित नागरिकांना नवीन सदनिकाचे हस्तांतरण करण्यात आले BSUP प्रकल्पाअंतर्गत पुनर्वसन, कल्याण पश्चिम मध्ये व्ही.बी.चौक ,सेंट लॉरेन्स स्कूल समोर, वाडेकर उंबर्डे येथे उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले उप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते , महिला पोलीस कर्मचाऱ्यांना(दामिनी पथक) दुचाकीचे वाटप करण्यात आले आहे,अशी अनेक लोक उपयोगी व लोकाभिमुख कामाचे भूमी पूजन व उद्घाटन करण्यात आले आहे ,
आरक्षण क्र.४५ येथे नव्याने उभारण्यात आलेल्या उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले आहे. या सोबतच शहर स्वच्छता, वारसा जपणारे पुतळे उभारणी, सौंदर्यकरण अशा विविध उपक्रमाचे साखळी सुरू करण्यात आली आहे. या सर्व कामामुळे कल्याण डोंबिवली परिसरात चेहरा बदलणार असून, नागरी जीवनात मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडणारअसल्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे ,



