कल्याण पूर्व येथे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने श्रामणेर शिबिर संपन्न
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण पूर्व येथे आनंदवाडी, आनंद बुध्द विहारात मंगळवार दि १३ मे २०२५ रोजी भारतीय बौध्द महासभा ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने भव्य श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष डि एन धिवरे, होते तसेच या श्रामणेर शिबिरात भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड गुरुजी यांनी बोलताना सांगितले की या श्रामणेर शिबिरात दहा दिवस बसून मुले व उपासक हा व्यसनमुक्त होते आणि चांगल्या मार्गाला लागली असे बी एच गायकवाड गुरुजी हे कल्याण पूर्व येथे आनंदवाडी आनंद बुध्द विहारात श्रामनेर शिबिरात मार्गदर्शन करीत होते तसेच या शिबिरात श्रामणेर शिबिरात बसले होते त्याना सन्मान प्रमाणपत्र हे भन्ते जी आणि राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड गुरुजी, महाराष्ट्र राज्य चे बोराडे गुरुजी यांच्या हस्ते देण्यात असून दान दाते आणि पदाधिकारी यांचे मुले एस एस सी परीक्षा उत्तीर्ण झाले याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच या कार्यक्रमा प्रसंगी ठाणे जिल्हा शाखेचे सरचिटणीस छगन सुरवाडे सर, कोषाध्यक्ष बापू ढोडरे, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा शिलाताई तायडे, संस्कार सचिव उत्तम सोनवणे, संरक्षण सचिव संजय खराटे, यांच्यासह कल्याण तालुका अध्यक्ष अशोक जाधव, कोषाध्यक्ष घोडेस्वार, उल्हासनगर तालुका अध्यक्ष रोशन पगारे, सरचिटणीस संदीप उबाळे, कोषाध्यक्ष जीवन मोरे, मुरबाड तालुका अध्यक्ष संजय थोरात, आनंदवाडी शाखेचे कोषाध्यक्ष एकनाथ पगारे, रमेश सुरवाडे, सुभाष नगर शाखेचे अध्यक्ष अशोक एफ शिरसाट, उपासक उपासिका आणि समता सैनिक दल यावेळी उपस्थित होते
