लालचौकी स्मशानभूमीत तात्काळ बर्निंग स्टॅन्डवर पावसाळी शेड न उभारल्यास उपोषणाचा इशारा
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
सामाजिक कार्यकर्ते बाबा रामटेके यांचे केडीएमसी आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांना पत्र
कल्याण : कल्याण पश्चिमेतील लाल चौकी स्मशान भूमीत तात्काळ चार बर्निंग स्टॅन्ड तयार करून त्यावर पावसाळी शेड उभारावे. चार दिवसात हे काम सुरु न केल्यास केडीएमसी आयुक्तांच्या बिल्डिंग खाली उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते बाबा रामटेके यांनी केडीएमसी आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांना दिला आहे.
शुक्रवारी केडीएमसी विरोधी पक्ष नेते दिवंगत दिनेश तावडे यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिवदेह लालचौकी स्मशान भूमी येथे नेण्यात आले होते. या प्रसंगी माजी मंत्री खासदार जगन्नाथ पाटील, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, माजी आमदार नरेद्र पवार, प्रकाश भोईर व अनेक मान्यवर पत्रकार उपस्थित होते. त्याच वेळी थोडा थोडा पाऊस सुरु झाला. सर्वांनी स्मशानाची असुविधा पाहून नापसंती व्यक्त केली. जोरात पाऊस सुरु झाला असता तर पार्थिव देह जाळने मुश्किल झाले असते कारण स्मशान भूमीचे काम सुरु असल्याने तात्पुरते जाळण्याचे दोनच स्टॅन्ड केलेले आहेत त्यावर कोणतेही पावसाळी शेड उभे केलेले नाहीत.
दिवंगत दिनेश तावडे यांचे पार्थिव स्मशानात आणले गेले तेंव्हा प्रचंड गर्दी झालेली होती. आणि त्याच वेळी पत्रकार सचिन सागरे यांच्या वडिलांचे पार्थिवदेह स्मशानाच्या गेट वर आले. दोन जाळ्यान्याचे स्टॅन्ड जवळ जवळ असल्याने व गर्दी असल्याने जवळ जवळ एक तास सचिन सागरे यांच्या वडिलांचे पार्थिव देह ठेवलेली गाडी बाहेर उभी ठेवावी लागली. या बाबत अनेक पत्रकारांनी खेद व्यक्त केला.
विशेष म्हणजे या प्रसंगाच्या एक दिवस अगोदरच १५ तारखेला याच स्मशान भूमीच्या गैरसोई बाबत सर्वं वर्तमान पत्रात बातम्या छापून आलेल्या आहेत. याची दखल महापालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याने घेतली नाही. कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांच्या पर्यन्त या बातम्या पोहचल्या नाहीत का..? गेले साधारण वर्षभर या स्मशान भूमीचे धिम्या गतीने काम सुरु आहे. कोणीही लक्ष द्यायला तयार नाही.
त्यामुळे लालचौकी स्मशान भूमीत तात्काळ चार जाळण्याचे स्टॅन्ड तयार करण्यात यावे. जाळण्याच्या स्टॅन्ड वर पावसाळी शेड उभे करण्यात यावे. सुक्या लाकडांची चार महिने पावसाळ्यात पुरतील अशी सोय करण्यात यावी. स्मशान भूमीच्या कामाचा वेग वाढवावा. काम केव्हा सुरु केले व केव्हा पूर्ण करणार याच्या मुदतीचा, ठेकेदाराचा नावासह, कार्यकारी अभियंता यांचे नाव मोबाईल नंबर सह फलक (बोर्ड) लावण्यात यावा. २० मे पर्यन्त या बाबत कोणतीही कामाची सुरवात न झाल्यास केडीएमसी आयुक्तांच्या इमारती खाली उपोषण सुरु करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते बाबा रामटेके यांनी दिला आहे.



