Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

कल्याणच्या गांधरी ब्रिजवर भीषण अपघात

कल्याणच्या गांधरीब्रिजवर भीषण अपघात दोघांचा मृत्यू 

रिक्षाला धडक देऊन डंपर पडला कल्याणच्या गांधरी ब्रिजवर भीषण अपघात 

रिक्षाला धडक देऊन डंपर पडला गांधारी नदीमध्ये 

कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,

रिक्षाच्या चक्काचूर मध्ये एक महिला मृत्युमुखी तर दोन जण जखमी

 कल्याण :  कल्याण पश्चिम येथील गांधारी ब्रिजवर मंगळवारी सकाळी डंपर आणि रिक्क्षा धडकेत रिक्क्षातील एक महिला मृत्युमुखी तर दोन जण गंभीर जखमी झाल्याने  भीषण अपघात झाला. तर रिक्षाला धडक देऊन डंपर थेट ब्रिजचे कठडे तोडून नदीमध्ये पडल्याची घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आहे.                 

 सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिमेतील गांधरी ब्रीजवर कल्याण कडून पडघ्याकडे जाणाऱ्या डंपरची बापगावाकडून कल्याण कडे येणाऱ्या रिक्क्षाची भीषण धडक मंगळवारी सकाळी 7.30वा.सुमारास झालेल्या घटनेत रिक्क्षाचा चक्काचूर झाला. तर डंपर पुलाचा संरक्षक कठडा तोडून डंपर गंधारी खाडी पात्राच्या पाण्यात पडला. या भीषण अपघातात रिक्षा मधील रिक्षाचालक निलेश वानखेडे (27) यांची आई मंगल वानखेडे (55) रा. बापगाव जय मल्हार नगर हिचा दुर्दैवी मुत्यू झाला. निलेशसह एक महिला  जखमी  झाली. घटना प्रसंगी निलेश आईला वाचवा अशी आर्त हाक पुलावर जमलेल्या ना करीत होता. पण माणुसकी हरपत चालेल्या या युगात बघी मंडळी मोबाईल द्वारे व्हिडिओ आणि फोटो शूट काढण्यात रंगली होती. 

डंपर चालक आजम अली याने उडी मारीत स्वतचा जीव वाचवित थेट पोलीस स्टेशन गाठले असल्याचे समजते. घटनास्थळी तातडीने पोलीस यंत्रणांनी पोहचली. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी खाडी पात्रातील पाण्यात शोधकार्य सुरू केले. घटनास्थळी तहसीलदार यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. हा भीषण अपघात नेमका कशामुळे झाला हे कारण अद्याप देखील समजू शकले नाही. पोलिस तपासा अंती नेमके काय कारण होते हे समजेल.  गंधारी पुलावरील या भीषण अपघातामुळे पुलावरील वेग मर्यादा आणि सावधनाता आणि वाहतूक नियमांची कडकपणे अमंलबजावणी प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे दिसून येत आहे




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.