विविध भागांमध्ये पाणी पुरवठा बंद;
महावितरण कडून देखभाल दुरुस्तीचे काम
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) यांच्यातर्फे मंगळवारी १३ मे २०२५ रोजी देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कारणामुळे कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.
महावितरणच्या २२ के. व्ही.एनआरसी - २ फिडरवरील देखभाल दुरुस्ती मुळे सकाळी ९ ते दुपारी ५ या वेळेत विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत नेतवली जलशुद्धीकरण केंद्र (१५० द.ल.ली.) , मोहिली उंदचन केंद्र व मोहिली जलशुद्धीकरण केंद्र (प्रत्येकी १०० द.ल.ली.) कार्यरत राहणार नाहीत. त्यामुळे कल्याण ग्रामीण विभाग मांडा - टिटवाळा , वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी,कल्याण पूर्व - पश्चिम,डोंबिवली पूर्व - पश्चिम परिसरातील पाणीपुरवठा पूर्णतः खंडित राहणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचा पाणीपुरवठा विभागाच्या वतीने नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की, या दिवशीच्या पाणी कपातीसाठी पूर्वतयारी म्हणून आवश्यक पाण्याचा साठा करून सहकार्य करावे.

