कल्याण पूर्वेतील एफओबी, बुकिंग कार्यालय लवकरात लवकर पूर्ण करा - ठाकरे गटाची मागणी
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण पूर्वेत वर्षानुवर्षे रखडलेला एफओबी, बुकिंग कार्यलय, रिक्षा स्टँडचे नियोजन आदी रेल्वे परिसरातील समस्यांबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्यांनी कल्याण रेल्वे स्टेशन अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी रखडलेला एफओबी लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी केली. त्याच बरोबर कल्याण पूर्वेत रिक्षा स्टँडचे नियोजन करा , प्रसाधान गृह उभारण्याची मागणी देखील या बैठकीत करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्यासह शहर प्रमुख शरद पाटील, बाळा परब, विधानसभा संघटक रुपेश भोईर, जगदीश तरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कल्याण पूर्वेतील लोकग्राम ब्रिजचे काम कधी पुर्ण होणार, टेंडर चा कालावधी संपला असल्यास ठेकेदार याला ब्लॅकलिस्ट करून दंड वसूल करावा नागरीकांसाठी ताबडतोब पुल सुरू करण्यात यावा. कल्याण पूर्व येथे रेल्वेची मोठी जागा उपल्ब्ध असुन कल्याण डोंबिवली महानगर पालिका व रेल्वे डिपार्टमेट ने नागरीकांत साठी अदयाप रिक्षा स्टैंड, बस डेपो, टॅक्सी स्टंड, पे आणि पार्क, स्वछता गृह त्यांचे नियोजन करून नागरिकांना दिलास देणे आवश्य होतं पण अद्याप कल्याण पूर्वच्या लोकांना अशी कोणतीच सुविधा देण्यात आली नाही.
कल्याण पूर्व विभागचे ५०% सांडपाणी हे रेल्वे हद्दीतून दुर्गाडी खाडी कडे जाते पण काही ठिकाणी रेल्वे हद्दीत नाले बांधलेले नाहीत, तेसेच हे नाले पावसाळ्या पूर्वी साफ केले जात नाही. त्यामुळे कल्याण पूर्वेतील आनंदवाडी, गणेशवाडी, कोळसेवाडी, लोकग्राम, मंगल राघो नगर या परिसरात पावसाळयात त्या नाल्यांचे पाणी शिरते व त्याचा त्रास कल्याण पूर्वच्या नागरीकांना होत असतो त्यामुळे त्यांची ताबडतोब दखल घेणे आवश्यक आहे.
कल्याण रेल्वे स्टेशन रि मॉडलिंग' नावावर रेल्वे प्रशासनाकडून व ठेकेदाराकडून अनेक झाडांची कत्तल केली आहे पण नविन एक ही झाड लावले गेले नाही. हया बाबतीत ठेकेदार व संबंधीत रेल्वे अधिकारी हयांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. कल्याण रेल्वे स्टेशन वर अनेक असुविधा आहेत पूर्ण प्लॅटफार्मवर पीण्याच्या पाण्याच्या पुरेशी सुविता नाही. काही ठिकाणी पीण्याच्या पाण्याची सुविधा आहे पण त्याच्यात घाण पाणी साठलेले आहे ते वेळेवर साफ केले जात नाही त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
स्कायवॉक वर फेरीवाले बस्तान मांडून बसत असल्याने चालणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या फेरीवाल्यांवर कारवाई करावी आदींसह इतर मागण्या यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आल्या.

