कल्याण डोंबिवलीत ८ बोगस शाळा उघड - महापालिकेचा पालकांना इशारा; शाळेमध्ये प्रवेश घेऊ नका
कलम भूमी, कल्याण, प्रतिनिधी ,
इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे वाढत्या कलामुळे अनेक अनधिकृत प्राथमिक शाळा बिनधास्तपणे सुरू झाल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाने अलीकडेच राबवलेल्या सर्वेक्षण मोहिमेत एकूण ८ बोगस शाळा उघडीस आले आहेत. या शाळांनी शासनाची कोणतीही मान्यता घेतलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेचे उपायुक्त संजय जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले की, या शाळेमध्ये पालकांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये. ही शाळा पूर्णपणे बेकायदेशीर असून लवकरच यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. महापालिकेच्या
अहवालानुसार सर्वाधिक सात बोगस शाळा टिटवाळा परिसरात असून, उर्वरित एक शाळा डोंबिवली पश्चिमेमध्ये आहे. एल बी एस स्कूल बल्याणी टिटवाळा,सनराईस स्कूल बल्याणी टिटवाळा, संकल्प इंग्लिश स्कूल बाल्याणी टिटवाळा, पूर्ण प्रज्ञा इंग्लिश स्कूल बल्याणी टिटवाळा, पोलारीस कॉन्व्हेंट बल्याणी टिटवाळा ,डी.बी.एस स्कूल आंबिवली पश्चिम, ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल आंबिवली पश्चिम, बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्र नगर डोंबिवली पश्चिम या बेकायदेशीर शाळा महापालिकेच्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. मार्चपासून नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने, महापालिकेने वेळेची कारवाई केली असून, या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शासकीय मान्यता प्राप्त शाळेमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. महापालिकेने इशारा दिला आहे की, भविष्यात अशा बेकायदेशीर अन्य शाळा निदर्शनात आल्यास त्यांच्यावर देखील तत्काळ कारवाई केली जाईल. मुलांच्या भविष्यासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे , आणि प्रवेश घेताना शाळेची मान्यता तपासणी आवश्यक खात्री करावी. असे सूचना देण्यात आल्या आहे.

