२६ मे च्या मुसळधार पावसाने सत्संग विहारला वाचवले , मातीचा भराव काढ़ायची गरज़ भासली नाही, ९ हज़ार ब्रास माती, दगड नदीतुन गेली वाहुन ..
कलम भूमी, उल्हासनगर प्रतिनिधी,
बदलापुर : बदलापुर येथील हेन्द्रे पाड़ा जवळुन वाहणाऱ्या उल्हास नदी पात्रात करण्यात आलेल्या मातीच्या भरावा प्रकरणी अंबरनाथ तहसिलदार
कार्यालयाकडून सत्संग विहार संस्थेच्या व्यवस्थापकांना १० कोटी १६ लाख १७ हजार १४१ रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. सत्संग विहार यांनी अनधिकृतरित्या उल्हासनदी पात्रात केलेला भराव हा ८ हजार ९१२ ब्रास माती, १९६ ब्रास दगड आणि ८३ ब्रास दगड पावडर इतका आहे. त्यामुळे या गौण खनिजाचा दंड ९ कोटी ९३ लाख ६७ हजार १४१ इतका आहे. तर या भरावासाठी वापरण्यात आलेली यंत्र समुग्रीचा जातमुचलका रक्कम २२ लाख ५० हजार इतकी आहे. हा दंड येत्या सात दिवसात जमा करण्याचे आदेश ८ दिवसांपूर्वी दिले होते, त्याच सोबत निवासी नायब तहसीलदार अंबरनाथ यांनी त्यांचे पंचनाम्यात व अहवालात नमूद केलेला अनधिकृत रित्या केलेला माती /दगड / व दगड पावडर भराव हा दिनांक २५.०५.२०२५ पुर्वी स्वखर्चाने सर्व
भरावकाढून नदीपात्र पुर्ववत करावे असे निर्देश अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांनी दिले होते. परंतु २६ मे रोजी आलेल्या मुसळधार पावसामुळे सत्संग विहार येथील मातीचा भराव काढ़ायची गरज़ भासली नाही. ९ हज़ार ब्रास माती, दगड नदीला आलेल्या पुरातुन वाहून गेली आहे .

