वावेघर आदिवासी पाड्यात जीवनावश्यक वस्तूंची मदत
स्वामी समर्थ केंद्र पारनाका, श्री गणेश भक्ती मंडळ आणि पारनाका शिवजयंती उत्सव समितीचा उपक्रम
कलम भूमि, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : स्वामी समर्थ सेवा केंद्र,वावेघर,वाडा,जिल्हा पालघर येथे स्वामी समर्थ केंद्र,पारनाका श्री गणेश भक्ती मंडळ आणि पारनाका शिवजयंती उत्सव यांच्या वतीने स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट साठी, त्या भागातील आदिवासी पाड्यातील लोकांना, जिवनापायोगी वास्तू, अन्न धान्य,कपडे, रोख रक्कम तसेच वापरलेले चांगले कपडे यासाठी लोकांकडे मागणी करून आवाहन केले. तसेच आदिवासी पाड्यातील १२ आदिवासी सामूहिक विवाह साठी आणि त्यानिमित्त येणाऱ्या वऱ्हाड्याना सामूहिक भोजन व्यवस्था साठी लागणारे शिधा सामान,तसेच काही नवीन कपडे यासाठी आवाहन केले होते.,
त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून कमी कालावधीत लोकांनी दोन टेम्पो भरून अन्न धान्य,कपडे, महागड्या साड्या देऊ केले. पारनाका गणेश मंदिर समोर हा कार्यक्रम संपन्न झाला. कमलाकर पाटील हे चालवत असलेल्या संस्थेसाठी शिवसेना उप शहरप्रमुख ,शिवजयंती उत्सव संयोजक दिनेश शेटे, राजेश देसाई, अरुण जोशी, संजय शिर्के, शेखर पातकर , कोष्टी, चावरे , तुषार केळकर यांनी मोलाची कामगिरी बजावली. दिनेश शेटे यांच्या पुढाकाराने हब कार्यक्रम संपन्न झाला. इनरव्हील क्लबने १३ तारखेला होणाऱ्या सामूहिक विवाहासाठी वस्तुरुप भरपूर मदत केली.

