पत्रिपुल ते एम आय डी सी,कचोरे गाव येथील रस्त्याची दुरावस्था महा पालिकेचे दुर्लक्ष ,
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत असलेले महा पालिकेने B S U P अंतर्गत लाभार्थ्यांना दिलेल्या इमारतीत राहणारे हजारो नागरिक खड्डे पडलेल्या रस्त्या मधून ये जा करत आहेत,या रस्त्या वरून वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून खड्या मुळे खाड्यात साचलेले पाणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकां वर उडते
पत्रिपुल ते एम आय डी सी, कचोरे गावातू न जाणाऱ्या ह्या रस्त्याची चाळण झाली असून,पाच पाच फुटांचे खड्डे पडले असून या रस्त्यावर दूतर्फा रहिवाशी घरे व दुकाने आहे, येथील सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना अल्पसंख्यांग कल्याण पूर्व विभागाचे अध्यक्ष युशिफी मेमन यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांना दिलेल्या पत्रात रस्त्याच्या दुरवस्था ची माहिती दिली आहे,युशिफी यांनी महा पालिकेच्या अधिकाऱ्यांना रस्त्याच्या दुरुस्ती साठी सतत संपर्ग साधला असता , त्यांनी आश्वासन दिले नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची खंत स्थानिक नागरिकानी व्यक्त केली आहे,
