टिटवाळ्यातील इंदिरा नगर येथे केडीएमसी अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी दौरा करणार - आमदार विश्वनाथ भोईर यांचे स्थानिकांना आश्वासन
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
पावसाळ्याच्या तोंडावर विविध नागरी समस्यांनी हैराण झालेल्या टिटवाळ्याच्या इंदिरा नगर येथील भागाची लवकरच केडीएमसी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करणार असल्याचे आश्वासन कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी दिले आहे.या भागांमध्ये गटार, पाणी आणि रस्त्यासह विविध नागरी समस्या असून आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी
प्रत्यक्ष भेट देत त्या जाणून घेतल्या. त्यावेळी या सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन देत लवकरच केडीएमसी अधिकाऱ्यांसमवेत याठिकाणी आपण पाहणी दौरा करणार असल्याचेही आमदार भोईर साहेब यांनी यावेळी सांगितले…
याप्रसंगी उपशहर प्रमुख विजय देशेकर, डॉ.धीरज पाटील, योगेश गायकवाड यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..


