ऐन रखरखत्या उन्हाळ्यात पदपथा लगतच्या झाडाची छाटणी कोणाच्या हितासाठी ?
पदपथावरील झाडाची सावली हरपल्याने नागरिकांचा संताप
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : ऐन उन्हाळ्यात उन्हाचा चटका आणि आंगाची होणारी काहिलीपासून झाडाच्या सावलीत थांबल्यावर क्षणभर तरी हायसे वाटते. पंरतु कल्याण पश्चिमेतील आग्रा रोड परिसरातील पदपथालगतच्या झाडाची छाटणी कुणाच्या हितासाठी केली असा संतापजनक सवाल नागरिकांकडून होत आहे.
कल्याण पश्चिम मध्ये आग्रा रोड येथे नवीन कल्याण ज्वेलर्स नावाने नवीन शोरुम सुरू करण्यात आले आहे. हे शोरुम स्पष्ट दिसावे म्हणून त्या शोरुम समोरील जुन्या झाडाची छाटणी लगबगीने करण्यात आली. धोकादायक झाडाची छाटणी करण्यासाठी अर्ज आदी स्पोस्कर केले तरी पाठपुरावा केला तरच प्रशासन छाटणीचे काम मार्गी लावते. असे असतानाच मात्र संदर्भीत परिसरातील उन्हाळ्यात सावली देणार्या झाडाची छाटणी कोणाच्या हितासाठी झाली असा सनसनाटी आरोप दक्ष नागरिकांकडून यानिमित्ताने होत आहे. या वृक्षाच्या छाटणी संदर्भात परवानगी प्रश्न उपस्थित झाला असून छाटणी अंती उरलेला झाडाचा ढाचा गायब झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे. त्यावर कारवाई करणार का असा प्रश्न नागरिकांना पडला असून केडीएमसी प्रशासन याकडे लक्ष ठेवणार का असा सवाल पर्यावरण प्रेमी करीत आहेत. या संदर्भात केडीएमसी वृक्ष प्रधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता माहिती दिली की, महावितरणने संदर्भीत झाडाची छाटणी केली आहे.
