ख्रिस्ती समाजातील लाखो लोक ख्रिस्ती धर्म त्यागण्याच्या विचारात,
दि इंडियन ख्रिश्चन असोसिएशन महाराष्ट्र संस्थापक नोवेल साळवे यांनी व्यक्त केली चिंता,
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कार्डिनल जॉन रॉडरिक्स, आर्च बिशप मुंबई व ख्रिस्ती धर्म प्रांत प्रमुख सर्व पंथाचे बिशप यांना पाठवले पत्र
कल्याण : काही पिढ्यांपुर्वी ख्रिस्ती समाजातील प्रेम, सद्भावना, एकोपाच्या आकर्षणात ख्रिस्ती धर्म स्वीकारून जे लोक ख्रिश्चन झाले आज काही वैविचारी स्वार्थी धर्मगुरूंमुळे ख्रिस्ती समाजात ते प्रेम दिसत नसल्याकारणाने राज्यात आणि देशात ख्रिस्ती समाजातील लाखो लोक ख्रिस्ती धर्म त्यागण्याच्या विचारात असल्याची चिंता दि इंडियन ख्रिश्चन असोसिएशन महाराष्ट्र संस्थापक नोवेल साळवे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी कार्डिनल जॉन रॉडरिक्स, आर्च बिशप मुंबई व ख्रिस्ती धर्म प्रांत प्रमुख सर्व पंथाचे बिशप आणि धर्मगुरू, महाराष्ट्र, भारत यांना पत्र पाठवले आहे.
सध्या महाराष्ट्र सहीत संपूर्ण देशात ख्रिस्ती समाजात बर्याच पैकी बिशप आणि धर्मगुरूं बद्दल असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवण प्रमाणें प्रेम हा ख्रिस्ती धर्माचा मुलभूत आधार आहे परंतु या धर्मगुरूंच्या स्वार्थी स्वभाव व वैविचारी वागणुकीमुळे ख्रिस्ती समाजातील बंधूभाव आणि आपआपसातील प्रेम हे संपुष्टात आले सारखे दिसून येत आहे. काही पिढ्यांपुर्वी इतर समाज आणि धर्मा मधून लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचा हा एकमेव कारण होता की ख्रिस्ती धर्म हा सत्य आणि प्रेमावर चालणारा धर्म आहे, त्या आकर्षणामुळे लाखो लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारून ख्रिश्चन झाले परंतु आजच्या घडीला ख्रिस्ती समाजात ना सत्य राहीला आहे ना प्रेम राहीले आहे.
या सर्व गोष्टींचे मुळ कारण आहेत ते धर्मगुरू, धर्मगुरू हे चर्च मध्ये फक्त पवित्र बायबल चे उपदेश देण्यासाठी नसतात तर त्यांचे मुळ कर्तव्य आहे की त्यांनी चर्च मधील मंडळींना एकत्र करून त्यांच्या मध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकी निर्माण करणे आहे. परंतु तसे न करता धर्मगुरू स्वताच्या स्वार्थासाठी चर्च मधील मंडळीं मध्ये फुट टाकून ठेवतात. या पलीकडे जाऊन पाहिले तर काही वरिष्ठ धर्मगुरू बिशप हे तर अक्षरश गपचूप धर्मप्रांत आणि चर्च ची मालमत्ता (प्रॉपर्टी) कोणालाही न कळवता विकत आहेत, जे मालमत्ता ख्रिस्ती समाजातील गोरगरीब लोकांच्या उपयोगासाठी या आधीचे प्रामाणिक बिशप आणि धर्मगुरूंनी मोठ्या कष्टाने साठवून ठेवले होते तेच मालमत्ता आजचे हे बिशप आणि धर्मगुरू विकून संपूर्ण ख्रिस्ती समाजाला बदनाम करून कमजोर करण्याचा काम करत असल्याचा आरोप नोवेल साळवे यांनी केला आहे.
तरी वेळीच ख्रिस्ती धर्मातील सर्व धर्म पंथांचे बिशप आणि धर्मगुरू यांनी आपले आचरण बदलावे आणि नैतिकतेची पालन करत येशू ख्रिस्ताच्या शिकवण वर चालून ख्रिस्ती समाजातील लोकांची सेवा करावी, अन्यथा देशातील संपूर्ण ख्रिस्ती समाज विखुरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी चिंता नोवेल साळवे यांनी व्यक्त केली आहे.

