कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत १५४ अर्जा पैकी छाननीत 14 अर्ज बाद
१८ जागांसाठी होणार निवडणूक
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक पदाची निवडणूक 29 जून रोजी होणार असुन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 154 उमेदवारांनी अर्ज दाखल झाले होते. सोमवार 2जून रोजी छाननी अंती 14अर्ज बाद झाल्याने 140 उमेदवार निवडणूक रिगंणात असून अर्ज मागे घेण्याच्या 3 जून ते 17जून पर्यंत कालावधीत किती उमेदवार अर्ज मागे घेतात. त्यानंतरच निवडणूक रिंगणात किती उमेदवार असतील हे चित्र स्पष्ट होईल. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदाच्या एकूण 18 जागा असुन त्या मध्ये शेतकरी सेवा सोसायटी मतदार संघ 11 जागा, ग्रामपंचायत मतदार संघ 4 जागा, व्यापारी 2, हमाल माथाडी एक जागा हे मतदार संघ आहेत. तर 18 जुन रोजी उमेदवारांना निशाणी वाटप व 29 जुन रोजी मतदान व त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध असलेली कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. बाजार समितीवर महायुती कि महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार हे लवकरच समजेल. संचालक पदाच्या निवडणूक साठी राजकीय क्षेत्रातील मान्यवर, तसेच माजी संचालक निवडणूक रिंगणात उमेदवार म्हणून उतरले असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत राजकीय पक्षासह, सर्वसामान्य वर्गाचे लक्ष लागल्याचे यानिमित्ताने दिसत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डीडीआर विशाल जाधववार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, 154 अर्ज दाखल करण्यात आले होते. छाननी अंती 14अर्ज बाद झाले असून उद्या यासंदर्भात उमेदवार यादी लावणार आहोत.
